शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुद्दाम विचित्र कमेंट करायचा आणि…”, ‘बिग बॉस १८’ मधून बाहेर पडताच नायरा बॅनर्जीचे करणवीर मेहरावर गंभीर आरोप, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 29, 2024 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 18 Evicted Contestant Nyrraa Banerji

'बिग बॉस १८' मधून बाहेर पडताच नायरा बॅनर्जीचे करणवीर मेहरावर गंभीर आरोप

Bigg Boss 18 Evicted Contestant Nyrraa Banerji  : ‘बिग बॉस १८’ मधून बाहेर पडल्यानंतर नायरा बॅनर्जीने करणवीर मेहराबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सलमान खानसाठीही बोल लगावत तिचा राग शिल्पा शिरोडकरवर काढला. नायरा बॅनर्जी घरातून बाहेर पडलेली तिसरी स्पर्धक ठरली. नुकत्याच झालेल्या डबल एलिमिनेशनमध्ये तिला ‘बिग बॉस १८’ मधून एक्झिट घ्यावी लागली. नायरा बॅनर्जीने आश्चर्य व्यक्त करत असं म्हटलं की, ‘तिला शोमध्ये फार कमी स्क्रीन वेळ देण्यात आला. शिवाय या एलिमिनेशनमुळे अभिनेत्रीला खूप मोठा धक्का बसला’.

नायरा बॅनर्जी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाली, “मला मोठा धक्का बसला आहे. माझा स्क्रीन टाइम इतका कमी आहे हे मला माहीत नव्हते. हे खरोखरच विचित्र होते. सलमान खानच्या फीडबॅकच्या आधारे स्पर्धकांनी माझ्याबद्दल चुकीचे मत बनवले. हे त्यांनी केलेले गृहीतक होते आणि ते पक्षपाती होते”. याआधी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने नायरा बॅनर्जीला इशारा दिला होता, अशी माहिती आहे. नायरा म्हणाली की, “करणवीर लोकांना विनाकारण ट्रिगर करतो”. ती म्हणाली, “करण जिममध्ये विचित्र कमेंट करत असे कारण मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. पण मला त्याच्याशी असं जोडायचं नव्हतं. जरी त्याने खेळाची सुरुवात चांगली केली असली तरी तो ट्रिगर करत होता”.

आणखी वाचा – शशांक केतकरने ठाण्यातील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर महानगरपालिकेने घेतली दखल, साफसफाई बघून म्हणाला, “तक्रार करावी तरंच…”

तेव्हा ती म्हणाली, “करणवीरचे पुढचे पाऊल काय असेल हे तुम्हाला माहीत नाही का? तो खूप हुशार आहे. जर त्याने योग्य खेळ खेळला तर तो पुढे जाऊ शकतो. पण करणवीरची प्रतिमा तयार झाली आहे. करणवीर विवियनसह असुरक्षित आहे. तो कुटुंबाचा प्रमुख असेल असे त्याला वाटले. पण विवियन व करणवीर दोघांनाही एका टोळीचा ताबा घ्यायचा आहे. तो चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याचा काही उपयोग नाही”.

आणखी वाचा – सूरज चव्हाण प्रचारसभेत, स्टेजवर जाऊन भाषणही केलं, अजित पवारांना पाठिंबा

त्यानंतर नायराने शेहजादा धामीबरोबरच्या तिच्या बॉन्डबद्दल भाष्य केलं. त्यांच्या बॉन्डला अफेअर म्हणून संबोधले जात होते, परंतु अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितले की शहजादा तिचा चांगला मित्र आहे. ती म्हणाली, “प्रिन्स आणि मी चांगले मित्र आहोत. आम्ही दोघी श्रुतिकाबरोबर खूप वेळ घालवायचो”. नायरा पुढे म्हणाली, “मी पाहिले की शिल्पाजी माझ्यापासून अंतर राखू लागल्या होत्या. मी अविनाशसह तिच्यासाठी भांडले होते. पण मी जास्त त्यांच्याशी संवाद साधला नाही”.

Tags: Bigg Boss 18 Evicted Contestant Nyrraa Banerjikaranveer mehranyrra banerji
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saatvya Mulichi Saatvi Mulgi Marathi serial update Kedar attempts to kill Maithili new promo viral on social media

Saatvya Mulichi Saatvi Mulgi : केदारकडून मैथिलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, नेत्राने वाचवला जीव, राज्याध्यक्ष कुटुंबाला सत्य कळणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.