Bigg Boss 17 Update : ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोची प्रेक्षकांमध्ये सध्या अधिक क्रेज असलेली पाहायला मिळतेय. सलमान खान होस्ट करत असलेल्या हिंदी ‘बिग बॉस १७’ ने प्रेक्षकांना वेड केलं आहे. वादग्रस्त कार्यक्रमांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढलेली पाहायला मिळतेय. यंदाच्या पर्वात दमदार स्पर्धक पाहायला मिळत असून पहिल्या दिवसांपासूनच त्यांच्यात खटके पडू लागल्याचं चित्र आहे. अशातच हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यापासून हे पती पत्नी कमी आणि वैरी अधिक वाटू लागले आहेत.
अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्यांत ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून खटके उडू लागलेले साऱ्यांनी पाहिले आहेत. अंकिताने विकी तिला वेळ देत नाही, असा आरोप त्याच्यावर लगावला. आता यावर विकीने ही मौन सोडलं आहे. अंकिता विकीला म्हणाली की, “तू एकदम परफेक्ट खेळत आहेस, पण पती म्हणून मी तुझ्यावर नाराज आहे. तुझं कुठेतरी माझ्याकडे खूप दुर्लक्ष होतयं. तू इतरांसह तासंतास जाऊन बसतोस, जे मला अजिबात आवडत नाही, जर मी पण जाऊन लोकांसोबत १०-१० तास गप्पा मारत बसले तर तुला आवडेल का?, असा सवाल तिने विकीला केला. “मी कमजोर होत आहे. मला वाटले तू माझी ताकद आहेस पण तू नाहीस” असंही ती म्हणते.
अंकिताचं बोलणं ऐकून विकी चिडून बोलतो की, “तू विचित्र तोंड करुन बसलेली असतेस मग असं वाटणारंच. मी काय करु? मी इथेच बसू का? मी आज दिवसभर ही खोली सोडणार नाही. बस. तू मेकअप करत बसतेस, माझा अपमान करते, मी हे करू का? मी तुला बाहेर नेहमी सांगितले आहे की, या गोष्टी माझ्याकडून होऊ शकत नाहीत, मी हे सर्व करू शकत नाही आणि तुला सर्व काही माहित आहे. हे मी आज म्हणत नाही आहे, तुला नेहमी माहित आहे की मी हे सर्व करू शकत नाही.”
एवढंच नाही तर विकी अंकिताला, “माझ्यासमोर येऊ नकोस आणि मला तोंड दाखवू नकोस” असंही बोलताना दिसतो. हे सर्व ऐकून अंकिता चेहरा झाकून रडू लागते. शेवटी विकी अंकिताला असंही बोलतो की, “मी तुझ्या सूचनांचे पालन करणार नाही, मी इथे नाक कापायला आलेलो नाही. तुला जे हवं ते कर.”