‘बिग बॉस १७’ या रिॲलिटी शोमध्ये अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांनी सहभाग घेतला होता. दोघांमधील विकोपाला गेलेले वाद विशेष चर्चेत राहिले. दरम्यान दोघांच्या या भांडणात कुटुंबीयांनीही सहभाग घेतलेला पाहायला मिळाला. शो संपल्यानंतर मात्र त्यांच्यातील भांडण विसरत दोघेही एकमेकांसह वेळ घालवताना दिसले. यानंतर अंकिताने व्हॅलेंटाईन डेही साजरा केला, पण या खास दिवशी विकी तिच्याबरोबर नव्हता. कारण काही कामानिमित्त तो त्याच्या मूळ गावी बिलासपूरला गेला आहे. यामुळे अंकिताने तिच्या पालकांसह हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला. अंकिता तिच्या आजी व आईसह डिनर डेटला गेली होती. (Ankita Lokhande On Valentines Day)
अंकिता लोखंडेचा कुटुंबाबरोबरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभी आहे. यावेळी पापाराझींबरोबर साधलेल्या संवादात ती सांगत आहे की, आज तिची आजी तिची व्हॅलेंटाईन आहे. तेव्हा तिला प्रश्न विचारला जातो, “विकी आला नाही?”, यावर अभिनेत्री उत्तर देते, ‘आजची व्हॅलेंटाइन माझी आजी आहे”. पुढे ती म्हणते, “फॅमिली व्हॅलेंटाईन”. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला विकीने दिलेल्या गिफ्टबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसह कॅप्शन देत तिने असं लिहिले आहे की, “खूप धन्यवाद. मी तुला खूप मिस करत आहे. लवकर परत ये” असं तिने म्हटलं आहे.
फॅमिली बरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याने अंकिता विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. तिच्या कुटुंबीयांबरोबरचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिताचं भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “ओह, संस्कारी अंकिता जी”, असं म्हटलं आहे. तर आणखी एका चाहत्याने कौतुक करत, “आमची मुलगी नातेसंबंधांची, मुलगी मनाची”, असं म्हटलं आहे.

अंकिताने एका मुलाखतीत सांगितले की, “विकीला एका महत्त्वाच्या कामानिमित्त त्याच्या मूळगावी बिलासपूरला जावे लागले”. गेल्या वर्षी विकीने तिच्यासाठी सरप्राइज ट्रिपची योजना आखली होती. दोघेही शिमल्याला गेले होते, असंही ती म्हणाली. पुढे अभिनेत्री म्हणाली की, “जेव्हापासून ती विकीला भेटली तेव्हापासून ते दोघेही व्हॅलेंटाईन डे ‘कॅन्डल लाईट डिनर’ करुन किंवा कुटुंब व मित्रांसह घरी एन्जॉय करत साजरा करत आले आहेत. अंकिताने पापाराझींना असेही सांगितले की, “ती विकीला खूप मिस करत आहे. मात्र, विकीने तिच्यासाठी बिलासपूरहून अनेक भेटवस्तूही पाठवल्या आहेत”.