रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईचे निधन, ‘इंडियन आयडल’मध्ये लेकाचं झालेलं कौतुक पाहून ढसाढसा रडल्या होत्या अन्…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 15, 2024 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kargil war hero captain vikram batra’s mother Kamal kant mother of dies at 77 video goes viral from indian idol 12

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईचे निधन, 'इंडियन आयडल'मध्ये लेकाचं झालेलं कौतुक पाहून ढसाढसा रडल्या होत्या अन्...

Captain Vikram Batra Mother Passes Away : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला ‘शेरशाह’ चित्रपट तुम्हा सर्वांना आठवतच असेल. २०२१ मध्ये आलेल्या ‘शेरशाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट कारगिल युद्ध (१९९९) परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने शहीद विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. त्याच परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईचे निधन झाले आहे.  

कमलकांत बत्रा या ७७ वर्षांच्या होत्या. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त येत आहे. तसेच कमलकांत बत्रा या काही दिवसांपासून आजारीसुद्धा होत्या. दरम्यान काल (१४ फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले.

आणखी वाचा – प्रथमेश परबनंतर सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांसचा साखरपुडा सोहळा संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कॅप्टन विक्रम बत्राचे वडील जीएल बत्रा आणि त्यांची आई यांनी ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्या आपल्या शहीद मुलासाठी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी “मला अभिमान आहे की, मी अशा मुलाला जन्म दिला ज्याने त्याचे आयुष्य या देशाला समर्पित केले”

आणखी वाचा – नवऱ्याशिवायच व्हॅलेंटाइन डे अन्…; एकमेकांपासून लांब आहेत अंकिता लोखंडे व विकी जैन, म्हणाली, “त्याने मला खूप…”

शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईच्या निधनावर सर्वांनी शोक व्यक्त केला असून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजलीही वाहिली आहे.  दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार (१५ फेब्रुवारी) रोजी पालमपूर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त मिळत आहे.

Tags: bollywood newsHeart AttackKamalkant BatraMartyr Captain Vikram BatraMartyr Captain Vikram Batra Mother Passes AwaySad Newsकमलकांत बत्रादु:खद बातमीबॉलिवूड बातमीशहीद कॅप्टन विक्रम बत्राशहीद कॅप्टन विक्रम बत्रा आई निधनहृदयविकार झटका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Salaar the kerala story dunki ott release this week on 16th February 2024 see the details

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘हे’ लोकप्रिय चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.