शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या शोमधून ‘हा’ स्पर्धक पडला घराबाहेर, ‘या’ कारणामुळे झाली एक्झिट, चाहत्यांना बसला धक्का

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 21, 2024 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg boss 17 ayesha khan eliminated by audience poll based on the roast task see the details

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या शोमधून ‘हा’ स्पर्धक पडला घराबाहेर, ‘या’ कारणामुळे झाली एक्झिट, चाहत्यांना बसला धक्का

Bigg Boss Upadtes : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व चांगलेच गाजले. ‘बिग बॉस’च्या यंदाचे पर्वात अनेक भांडणे, वाद, विवाद झाल्याचे पाहायला मिळाले. ‘बिग बॉस १७’चा प्रवास आता अंतिम भागाच्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे घरात बाकी असलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच नुकयाच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये एका स्पर्धकाला या घरातून निरोप घ्यावा लागला आणि ती स्पर्धक म्हणजे आयेशा खान. आयेशा खानला कमी मतं मिळाल्यामुळे तिचा अंतिम भागाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास काल (शनिवार २० जानेवारी) रोजी संपला.

एलिमिनेशनच्या यादीत विकी जैन, ईशा मालवीय व अंकिता लोखंडे यांचा समावेश होता. त्याच वेळी, जेव्हा ‘बिग बॉस’ आयेशाचे नाव घेतात आणि म्हणतात की “तुझा प्रवास आज इथे संपत आहे.” हे ऐकताच आयेशा भावुक होते. ‘बिग बॉस’च्या गेल्या भागाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात आयेशाला निरोप देताना घरतील इतर सदस्यही भावुक होतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आयेशाला निरोप देताना अंकिताला रडू येते व ती तिला घट्ट मिठी मारते. तसेच मन्नाराही आयेशाबरोबरचे पूर्वीचे वाद विसरून तिला मिठी मारत निरोप देते व “चला लवकरच हैदराबादमध्ये तुझ्या चित्रपटाच्या प्रीमिअरला भेटू” असं म्हणते. यापुढे ती विकीला भेटते आणि विकी तिला मिठी मारत “तू आता माझ्या कुटुंबाचाच एक हिस्सा आहेस” असं म्हणतो.

THE MOMENT #AyeshaKhan got Evicted!!
& #AnkitaLokhande #VickyJain #IshaMalviya reached to Finale week ????#MannaraChorpa ne apni bat prove kar di ????

Follow me Pls ????#BB17 #BiggBos17 #BiggBoss #BiggBoss17 #MunAra #AnkuHolics pic.twitter.com/LfEGYTA0ik

— Bigg Boss Livefeed_24X7 (@Sk_Khonji__24X7) January 20, 2024

आणखी वाचा – रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडीओ प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, अभिनेत्रीने पोस्टद्वारे मानले पोलिसांचे आभार, म्हणाली…

यापुढे ती अरुण व अभिषेकला भेटून मुन्नवरच्या दिशेने जाते आणि “आपला प्रवास इथेच संपला…” असं म्हणते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आयेशा भविष्यातही मुन्नवर बरोबरची तिची लढाई सुरूच ठेवणार आहे. आयेशा या घरात येताच ती मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटली होती. यानंतर  घरात अनेकदा आयेशाने मुन्नवरबरोबर वाद घातले असल्याचे पाहायला मिळाले. तसेच मुन्नवरदेखील आयेशामुळे रडला असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण आता आयेशाचा या घरातील प्रवास संपला आहे.

आणखी वाचा – “घटस्फोट घेण्याचा निर्णय…”, शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाबाबत सानिया मिर्झाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “एखादी स्त्री…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातील यावेळची नॉमिनेशन प्रक्रिया खूप वेगळ्या पद्धतीने पार पडली. घरातील सदस्यांसाठी रोस्ट नाईटचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात सर्व स्पर्धकांनी घरात आलेल्या प्रेक्षकांसमोर सादरीकरण केले. सर्व स्पर्धकांच्या कामगिरीवर तेथे उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना मत दिले. या मतदानाच्या आधारे आयेशाला सर्वात कमी मते मिळाल्याने ती या घरातून बाहेर पडली.  

Tags: ayesha khanbigg bossbigg boss 17bigg boss newsBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsMunnawar Faruquiआयेशा खानबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस बातमीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीमुन्नवर फारुकी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Aashram 4 mirzapur 3 kaala pani 2, patal lok, panchayat, kota factory ott release date see the details

‘काला पानी’, ‘आश्रम’, अन् ‘पाताल लोक’, 'या' दिवशी येणार गाजलेल्या वेबसीरिजचे नवीन सीझन, वाचा ‘कधी’ व ‘कुठे’ पाहू शकाल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.