मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘काला पानी’, ‘आश्रम’, अन् ‘पाताल लोक’, ‘या’ दिवशी येणार गाजलेल्या वेबसीरिजचे नवीन सीझन, वाचा ‘कधी’ व ‘कुठे’ पाहू शकाल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 21, 2024 | 1:12 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aashram 4 mirzapur 3 kaala pani 2, patal lok, panchayat, kota factory ott release date see the details

‘काला पानी’, ‘आश्रम’, अन् ‘पाताल लोक’, 'या' दिवशी येणार गाजलेल्या वेबसीरिजचे नवीन सीझन, वाचा ‘कधी’ व ‘कुठे’ पाहू शकाल

२०२४ हे नवीन वर्ष मनोरंजनासाठी खूपच रोमांचक असणार आहे. कारण या वर्षात अनेक गाजलेल्या चित्रपट व वेबसीरिजचे सीकवेल्स (पुढील भाग) येणार आहेत. येत्या नवीन वर्षात पंचायत, आश्रम, पाताल लोक, मिर्झापुरसारख्या अनेक लोकप्रिय सीरिजचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर जाणून घेऊयात यंदाच्या वर्षी कोणकोणत्या नवीन सीरिजचे भाग प्रदर्शित होणार आहेत.

मिर्झापूर : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही सीझन प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले.  अशातच येत्या मार्च महिन्यात या सीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

पंचायत : पंचायत या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन्स चाहत्यांच्या भेटीला आले असून आता या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच अ‍ॅमेझोन प्राइम या ओटीटी माध्यमाने या सीरिजचा पहिला लुक प्रदर्शित केला. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ही सीरिज प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

आश्रम : बाबा निरालाचे काळे कारनामे दाखणारी आश्रम ही सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या सीरिजचे आतापर्यंत ३ सीझन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. अशातच आता या सीरिजचा चौथा सीझनही प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात. अद्याप याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. पण चाहते चौथ्या सीझनची खूपच वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडीओ प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, अभिनेत्रीने पोस्टद्वारे मानले पोलिसांचे आभार, म्हणाली…

पाताल लोक : सस्पेन्स, थ्रीलर व क्राइमने भरलेल्या या सीरिजचा पहिला सीझन चाहत्यांना खूपच आवडला होता. अशातच आता या सीरिजचा दूसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र याबद्दलची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या शोमधून ‘हा’ स्पर्धक पडला घराबाहेर, ‘या’ कारणामुळे झाली एक्झिट, चाहत्यांना बसला धक्का

काला पानी : २०२३ मधील सर्वात गाजलेली वेबसीरिज म्हणजे काला पानी. प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांतच ही सीरिज जवळपास ११ देशांमध्ये ट्रेंडिंगवर होती. त्यामुळे या लोकप्रिय सीरिजच्या दुसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

कोटा फॅक्टरी : कोटा फॅक्टरी ही सीरिज मुलांच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करते. या सीरिजचे आतापर्यंत २ सीझन्स आले असून येत्या वर्षात या सीरिजचा तिसरा सीझनही चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरिज प्रदर्शित होणार आहे.    

Tags: ओटीटी बातमीमनोरंजन बातमीमिर्झापुरआश्रमकाला पानीकोटा फॅक्टरीबॉलिवूड मनोरंजनपंचायतपाताल लोकवेबसीरिजAshramBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsKaala PaniKota Factorymirzapurott newsPanchayatPatal Lokwebseries
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Bollywood and marathi actor Manoj Joshi opinion about propaganda films he said there is nothing wrong in that see the details

“इतिहास नीट सांगितला... ”, ‘प्रोपगंडा’ चित्रपटांबद्दल मनोज जोशींचं परखड मत, म्हणाले “त्यात काही गैर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.