सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ची. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर यांच्यासह अन्य सदस्यांच्या दमदार खेळीने हे पर्व देखील प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील दोन दमदार मानले जाणारे खेळाडू म्हणजे जान्हवी किल्लेकर व घनश्याम दरवडे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी व घनश्याम मध्ये मोठा वाद पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान, जान्हवी घन:श्यामला असं म्हणते की, “घरात सर्वांना माहीत आहे की, तुझ्यात अक्कल नाहीये. तुला अख्ख्या घराने नॉमिनेट केलं”. यावर घन:श्याम अस म्हणतो की, “मला काहीही फरक पडत नाही तू जेलमध्ये राहून आली”. यावर जान्हवी पुन्हा त्याला ‘बावळट’ व अक्कलशून्य म्हणते आणि यावर घन:श्यामही तिला “तुझ्याइतका नाही” असं म्हणते. (janhvi killekar ghanshyam darwade fight)
‘बिग बॉस’च्या या प्रोमोवर प्रेक्षकही कमेंट्स करत व्यक्त झालेले पाहायला मिळाले. या प्रोमोवर प्रेक्षकांनी,” जान्हवी फुटेज घेते गरीब घनश्याम वर ओरडुन निक्कीला भिडू शकत नाही…”,”छोटा पाकीट बडा धमाका वा घनशाम मस्त तू भिड जान्हवीला फक्त”,”जान्हवी आर्या पेक्षा घनश्याम कितीतरी पटीने उत्तम आहे” अशा कमेंट्स करत घनश्यामच कौतुक केलं आहे. तर अनेकांनी जान्हवीला खडेबोल देखील सुनावले आहेत. “जान्हवी स्वतः च्या मुलावर डोळे फाडून असे ओरडेल का…??”,”जान्हवी तुझी जागा जेलमध्येच ठीक आहे. तुझ्या बोलण्या वागण्यात जराही सुधारणा नाही. म्हणून तुला वीकेंडला बाहेर बसावं लागतंय” अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी जान्हवीला सुनावलं.
हे देखील वाचा- खास सरप्राइज, जंगी स्वागत अन्…; खूप दिवसांनी बायको घरी येताच सिद्धार्थ चांदेकरचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल
‘बिग बॉस’च्या सोमवारच्या भागात घन:श्याम व जान्हवी यांच्यात वाद झाला होता. जान्हवीने त्याला तुला लाज आहे का?” असं म्हटलं होतं. यावर चहोता पुढारीने “आता तुझ्याकडून तेवढंच शिकायचं राहिलं आहे. बाकी सगळं शिकलो आहे. तुझ्याकडे थोडी लाज शिल्लक आहे. म्हणजे मला ती लाज घेता येईल” असं म्हटलं. यापुढे दोघांमध्ये खूपच वादावादी झाली आणि याच वादाचे पडसाद आजच्या भागातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नवीन प्रोमोमधून दोघांमधील वाद कोण मिटवणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (janhvi killekar ghanshyam darwade fight)
हे देखील वाचा- Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा एकदा निक्कीची मनमानी, सर्व नियम मोडले अन्…; शिक्षा होणार का?
या आधी ‘बिग बॉस’च्या घरात जान्हवी, अरबाज, निक्की व वैभव यांचा एक ग्रुप पाहायला मिळत होता परंतु काही दिवसातच या ग्रुपमध्ये फूट पडलेली पाहायला मिळाली. जान्हवीच्या वागण्यामुळे तिला रितेश देशमुख यांनी शिक्षा देखील केली होती. जान्हवी-निक्कीच्या ग्रुपमध्ये फूट पडल्यानंतर आता अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, वर्षा उसगावकर यांच्या ग्रुपमध्ये वेगळ्या हालचाली सुरु असल्याचं देखील दिसतंय. तसेच ‘बिग बॉस’च्या घरात नुकतंच नॉमिनेशन देखील पार पडलं या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांपैकी या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.