रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तीन लग्न, दोन घटस्फोट, ३७ वर्षांनी लहान मुलीबरोबर रोमान्स अन्…; ‘बिग बॉस’ फेम गायकाचं असं होतं आयुष्य, वैवाहिक जीवन वादात

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 29, 2024 | 6:32 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
anup jalota married life

तीन लग्न, दोन घटस्फोट, ३७ वर्षांनी लहान मुलीबरोबर रोमान्स अन्...; 'बिग बॉस' फेम गायकाचं असं होतं आयुष्य, वैवाहिक जीवन वादात

भजन क्षेत्रात अनुप जलोटा यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्यांनी आजवर अनेक भजनं गायली आहेत. त्यांना भजन क्षेत्रात खूप लोकप्रियता मिळाली आहे. तसेच त्यांनी याआधी ‘बिग बॉस’च्या घरातही हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली दिसून आली. त्यांच्याबद्दलच्या अनेक पोस्ट व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलेदेखील पाहायला मिळाले. याचबरोबर त्यांच्या भजनाची चर्चादेखील सर्वत्र होताना दिसून येते. मात्र संगीत क्षेत्रापेक्षा त्यांचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले आहे. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आपण आता काही गोष्टी जाणून घेऊया. (anup jalota married life)

अनुप यांचे नाव संगीत क्षेत्रात प्रामुख्याने घेतले जाते. त्यांच्या भाजनांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर ते तीन वेळा लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचे पहिले लग्न सोनाली सेठबरोबर झाले होते. सोनाली एका गुजराती कुटुंबातून आहेत. त्यादेखील गायिका, गझल व भजन गायिका आहेत. त्या जेव्हा संगीताचे शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या अनुप यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघांनीही घरच्यांचा विरोध असतानाही लग्न केले होते.मात्र त्यांचे हे लग्न अधिक काळ टिकू शकले नाही. घटस्फोट घेत दोघेही वेगळे झाले. अनुप यांच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सोनाली यांनी गायक कुमार राठोडबरोबर लग्न केले.

आणखी वाचा – “लिपस्टीक नंतर लावा”, वर्षा उसगांवकरांवर भडकली निक्की तांबोळी, वादाची ठिणगी, म्हणाली, “तसंही कोण बघत नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by Anup Jalota (@anupjalotaonline)

पहिले लग्न तुटल्यानंतर अनुप यांनी घरच्यांचे म्हणणे ऐकून बिना भाटियाबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र ते लग्नदेखील अधिक काळ टिकू शकले नाही. दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. बिनाबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अनुप हे मेधा गुजराल यांच्या प्रेमात पडले. मेधा या मनोरंजन व राजकारण या दोन्ही क्षेत्राशी संबंधित आहेत. तसेच माजी पंतप्रधान आई.के. यांच्या पुतणी आहेत. मेधा यांचे पहिले लग्न दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याबरोबर झाले होते. या दोघांना एक मुलगादेखील आहे. मात्र २०१४ साली मेधा यांचे लिव्हर फेल झाले आणि दुसऱ्यांदा हृदय विकाराचा झटका आला. यामध्येच त्यांचे निधन झाले.

आणखी वाचा – “दोन कानाखाली मारायलाही मी…”, अश्विनी भावेंनाही इंडस्ट्रीमध्ये वाईट अनुभव, म्हणाल्या, “लोक मला घाबरतात आणि…”

त्यानंतर त्यांची प्रेमकहाणीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. यावेळी त्यांचे नाते एका ३७ वर्षांच्या त्यांच्या विद्यार्थिनीबरोबर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. जसलीन मथारुबरोबर ते ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वात दिसून आले होते. यावेळी त्यांच्या नात्यावरुन अनेक वादविवाददेखील झाले होते.  

Tags: anup jalotamarried lifewife
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi new season fame Suraj Chavan know more

आई-वडिलांचं निधन, आठवीपर्यंत शिक्षण, मजुरी केली अन्…; 'बिग बॉस मराठी'मध्ये आलेला सूरज चव्हाण असं जगतो आयुष्य, बारामतीमध्ये आहे घर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.