भजन क्षेत्रात अनुप जलोटा यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्यांनी आजवर अनेक भजनं गायली आहेत. त्यांना भजन क्षेत्रात खूप लोकप्रियता मिळाली आहे. तसेच त्यांनी याआधी ‘बिग बॉस’च्या घरातही हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली दिसून आली. त्यांच्याबद्दलच्या अनेक पोस्ट व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलेदेखील पाहायला मिळाले. याचबरोबर त्यांच्या भजनाची चर्चादेखील सर्वत्र होताना दिसून येते. मात्र संगीत क्षेत्रापेक्षा त्यांचे खासगी आयुष्य अधिक चर्चेत राहिले आहे. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आपण आता काही गोष्टी जाणून घेऊया. (anup jalota married life)
अनुप यांचे नाव संगीत क्षेत्रात प्रामुख्याने घेतले जाते. त्यांच्या भाजनांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर ते तीन वेळा लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचे पहिले लग्न सोनाली सेठबरोबर झाले होते. सोनाली एका गुजराती कुटुंबातून आहेत. त्यादेखील गायिका, गझल व भजन गायिका आहेत. त्या जेव्हा संगीताचे शिक्षण घेत होत्या तेव्हा त्या अनुप यांच्या प्रेमात पडल्या होत्या. दोघांनीही घरच्यांचा विरोध असतानाही लग्न केले होते.मात्र त्यांचे हे लग्न अधिक काळ टिकू शकले नाही. घटस्फोट घेत दोघेही वेगळे झाले. अनुप यांच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सोनाली यांनी गायक कुमार राठोडबरोबर लग्न केले.
पहिले लग्न तुटल्यानंतर अनुप यांनी घरच्यांचे म्हणणे ऐकून बिना भाटियाबरोबर लग्नगाठ बांधली. मात्र ते लग्नदेखील अधिक काळ टिकू शकले नाही. दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. बिनाबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अनुप हे मेधा गुजराल यांच्या प्रेमात पडले. मेधा या मनोरंजन व राजकारण या दोन्ही क्षेत्राशी संबंधित आहेत. तसेच माजी पंतप्रधान आई.के. यांच्या पुतणी आहेत. मेधा यांचे पहिले लग्न दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याबरोबर झाले होते. या दोघांना एक मुलगादेखील आहे. मात्र २०१४ साली मेधा यांचे लिव्हर फेल झाले आणि दुसऱ्यांदा हृदय विकाराचा झटका आला. यामध्येच त्यांचे निधन झाले.
त्यानंतर त्यांची प्रेमकहाणीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. यावेळी त्यांचे नाते एका ३७ वर्षांच्या त्यांच्या विद्यार्थिनीबरोबर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. जसलीन मथारुबरोबर ते ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वात दिसून आले होते. यावेळी त्यांच्या नात्यावरुन अनेक वादविवाददेखील झाले होते.