अभिनेत्री दिव्या अग्रवाल २० फेब्रुवारी २०२४ रोजी अपूर्व पाडगांवकरबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकली. मनोरंजन क्षेत्रांमध्ये त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. गुढीपाडव्यानिमित्त दिव्याने दोघांचेही गुढी उभारतानाचे फोटो शेअर केले होते. त्यानच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. पण आता लग्नाच्या तीन महिन्यांनंतर दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकतेच दोघेही हनिमूनवरुन परतले आहेत. त्यानंतर लगेच दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लग्नाचे सगळे फोटो डिलिट केले आहेत. (divya agarwal wedding photo delete )
एका रेडिट युजरने सांगितळे आहे की, “दिव्याने अपूर्वबरोबरचे लग्नातील सगळे फोटो डिलिट केले आहेत. दिव्याच्या फिडवर शेवटची पोस्ट १९ मार्च २०२४ची आहे. यामध्ये एक कोलॅब व्हिडीओ आहे. प्रोफेशनल फोटोशूट व प्रोजेक्टसंदर्भात पोस्ट वगळता दिव्याने आपल्या इन्स्टाग्रामवरुन सर्व फोटो डिलिट केले आहेत”.
तसेच अपूर्वबरोबरचा एकही फोटो ठेवला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा झाली. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हंटले की, “हा एक पीआर स्टंट वाटत आहे”, दुसरं नेटकरी म्हणाला की, “दिव्याने उगाच लक्ष वेधून घेण्यासाठी असे केले आहे”, तसेच अजून एक नेटकरी म्हणाला की, “यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, तिला सवय आहे”.
दिव्याबरोबरच तिचा पती अपूर्वने लग्नातील सर्व फोटो डिलिट केले आहेत. मात्र दिव्याबरोबरचे काही फोटो ठेवले आहेत. २४ मार्च रोजी दिव्या व अपूर्वला एकत्रित पाहण्यात आले होते. यावेळी दिव्याने सॅटिन-प्रिंटेड ड्रेसबरोबर सोनेरी रंगाचे दागिने घातले होते. तसेच यावेळी अपूर्वने जीन्स व क्लासी गॉगल घातले होते. यावेळी फोटोग्राफर्सनी लग्नाबाबत काही प्रश्नदेखील विचारले. लग्नामध्ये ती खूप खुश असल्याचे तिने सांगितले. मात्र आता अचानक लग्नाचे फोटो डिलिट करण्यामागे काय कारण आहे हे मात्र समजू शकले नाही. दिव्या व अपूर्व लवकरच या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देतील अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.