बिग बॉस १६ मध्ये सहभागी झालेली गोरी नागौरीला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकप्रिय डान्सर गौरी एका घरगुती कार्यक्रमासाठी किशनगढ येथे गेली असता तिच्या वाहिन्यांची नवऱ्यानेच तिला बेदम मारहाण केल्याचं तिने पोस्ट केलेल्या फोटो मार्फत सांगितले आहे.(Gori Nagori Attack Video)
२२ मे ला गोरी तिच्या टीम सोबत एका लग्नसोहळ्याला गेली होती. पण तिथे गेल्यावर तिला समजलं कि हा एक डाव आहे आपल्याला इथे बोलावण्याचा आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्याने काही मित्रांसोबाबत गोरी आणि तिच्या टीम वर हल्ला केला. या संदर्भात गोरी ने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. यावेळी पोलिसांनी तिच्या तक्रार न लिहून घेता हा तुमचा घरगुती प्रश्न आहे असं सांगून तक्रार लिहून घेण्यास नकार दिला.
गोरीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा(Gori Nagori Attack Video)
https://www.instagram.com/reel/CsnfJ7ZAmE-/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
या संदर्भात गोरी ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट करत राजस्थानच्या मुख्य मंत्र्यांना टॅग करत लिहिलं आहे माझ्या बहिणीचे पती जावेद हुसैनने माझ्या आणि माझ्या टीम ला फसवून आमच्यावर हल्ला केला . त्यात माझे काही टीम मेंबर देखील जखमी झाले आहेत. मला वडील नाहीत, भाऊ नाहीये मी आणि माझी आई दोघीच राहतो. माझ्या जीवाला या माणसांपासून धोखा आहे मला लवकरात लवकर सुरक्षा मिळावी आणि आंसाभ्यावर हल्ला करण्याला शिक्षा. मला तुमच्या कडून न्याय हवा आहे.”(Gori Nagori Attack Video)

अशी पोस्ट करत गोरी ने व्हिडिओ मध्ये काही जणांची नाव देखील सांगितली आहे आणि या लोकांपासून माझ्या जीवाला धोका असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर आता राजस्थान सरकार गोरीला सुरक्षा पुरवून तिला न्याय मिळनार का हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे.