झी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात नेहमी अग्रेसर असते. स्पर्धेच्या जगात वावरताना सगळ्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग तुम्हाला करावे लागतात. टीआरपी चा मागील काही महिन्यांचा उचांक पाहता झी मराठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन प्रयोग करताना दिसत आहे. नवा गाडी नवं राज्य, दार उघड बये या झी मराठीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत.अजूनही नवीन विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी झी मराठी सज्ज आहे.(hrishikesh shelar)
====
हे देखील वाचा – झी मराठी वरील ‘या’ प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
====
वाहिनी आणि मालिका कोणतेही असो प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी आतुर असतात. आवडत्या कलाकाराला एका विशिष्ठ पद्धतीच्या भूमिकेत सतत पाहण्यापेक्षा काही तरी नवीन करावं असं रसिक प्रेक्षकांना नेहमी वाटत असत. प्रेक्षकांच्या पसंतीतील असाच एक आवडता कलाकार झी मराठी वरील तुला शिकवीन चांगलाच धडा या नवीन मालिकेत दिसणार आहे.या कलाकाराचं नाव आहे अभिनेता ह्रिषीकेश शेलार.(hrishikesh shelar)
सुंदर मनामध्ये भरली या बहुचर्चित मालिकेतून काही दिवसांपूर्वी दौलतराव या पात्रा न प्रेक्षकांचा निरोप घेतला. नकारात्मक भूमिका साकारत असलेला दौलतराव म्हणजेच हृषीकेश ने प्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठे हि कमी पडू दिली नाही. भूमिका नकारात्मक असली तरी या पात्राचे चाहते ही बरेच होते. सुंदर मनामध्ये भरली या मालिकेतील निरोपानंतर हृषीकेश आता कुठल्या भूमिकेत दिसणार या संभ्रमात असलेले प्रेक्षक आता सुखावले आहेत.(hrishikesh shelar)
या मालिकेचा प्रोमो हृषीकेश ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. ज्या मध्ये तोच एका शाळकरी मुलाच्या भूमिकेत दिसत आहे तर अभिनेत्री शिवानी रांगोळे ही त्याच्या सोबत या प्रोमो मध्ये दिसत आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत ही नवीन जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन कोणत्या पद्धतीने करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.