छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिऍलिटी शो मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग जुळवत ओंकारने समस्त प्रेक्षकांना वेड लावले. सर्वांना हसविण्यात माहीर असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेला ओंकार आता मालिकाविश्वातून बाहेर येत सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला आहे. एकांकिका विश्वात तरबेज असलेला ओंकार मध्यंतरी छोट्या पडद्यावर चांगलाच रमला होता. आता मात्र ओंकारने नाटकविश्वाकडे त्याचा मोर्चा वळविला आहे. व्यवसायिक रंगभूमीवर पाऊल टाकत ओंकार ‘करून गेलो गांव’ हे भन्नाट विनोदी नाटक घेऊन रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.(bhau kadam onkar bhojane)
=====
हे देखील वाचा – ‘मी आणि माझ्या बायकोने ग्लुकोज बिस्किटाच्या पुडयावर कित्येक दिवस काढले’ प्रसादच्या संघर्षाची कथा
=====
या नाटकाची विशेष बाब म्हणजे ओंकारसह या नाटकात आणखी एका विनोदवीराला पाहणे रंजक ठरणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या रिऍलिटी शो मधून रसिकांच्या दिलावर राज्य करणारा अभिनेता भाऊ कदम या नाटकात ओंकारसह दिसणार आहे. ओंकार आणि भाऊ कदम ही विनोदवीरांची जोडगोळी रंगभूमीवर कल्ला करण्यास सज्ज झाली आहे. ‘करून गेलो गांव’ या नाटकांत भाऊ आणि ओंकारच्या जोडीला पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. मालवणी मातीतील हे नाटक नव्याने रंगभूमीवर यायला सज्ज झाले आहे. तर ओंकार भोजने आणि भाऊ कदम हे दोन्ही कलाकार मालवणी मातीतलेच आहेत. त्यामुळे त्यांच्या या नाटकातील अभिनयाकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

या नाटकाच्या निर्मितीची धुरा ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे पेलवत आहेत. तर या नाटकाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा राजेश देशपांडे यांनी सांभाळली आहे. मराठी माणसांच्या तोंडावर नाव असलेले हे दोन विनोदवीर आता रंगभूमीवरून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. कोकण कोहिनूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओंकार भोजनेला कॉमेडीचा बादशाह भाऊ कदमची साथ मिळणार आहे. आता हे दोन अवलिया एकत्र येऊन काय धम्माल उडवून देतील हे पाहण्यासाठी तर नाट्यगृहच गाठावं लागणार.(bhau kadam onkar bhojane)