मालिका विश्वात सध्या काही आघाडीच्या मालिका आहेत ज्या प्रेक्षक दररोजच्या आयुष्यात न चुकता पाहत असतात. या मालिकांमधील प्रत्येक पात्रावर तेवढच भरभरून प्रेम प्रेक्षकांकडून केलं जात. मालिकांच्या यादीतील भाग्य दिले तू मला या मालिकेवर देखील प्रेक्षकांचा असाच आशीर्वाद राहीला आहे. मालिकेतील आवडती जोडी राज कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे त्यांच्या पात्रांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकेत सध्या रत्नमाला या जीवनाशी झुंज देत आहेत. त्यामुळे आता मालिकेतून त्या निरोप घेणार अशी शंका प्रेक्षकांना होती. त्यांना न मिळणारी किडनी आणि आजारपण यावरून या शक्यता अजूनच दाट झाल्या पण आता अखेर एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज कावेरीवर आलेलं संकट आता दूर होताना दिसत आहे.(Ratnmala health update)
====
दे देखील वाचा- नाटू नाटू…. छे, छे नाचो नाचो
====
मालिकेत वैदेही राजवर्धन कडून सगळी प्रॉपर्टी घेऊन रत्नमाला यांना किडनी दान करते. परंतु घरातील इतर सदस्य या गोष्टीला विरोध करताना दिसतात. राजला सगळी प्रॉपर्टी विकण्याचा कोणताही हक्क नाही असं आकांक्षा म्हणते आणि राजशी वाद घालते. तर एका बाजूला रत्नमाला यांची किडनी ट्रान्सपरंटच ओप्रेशन सक्सेसफुल झाल्याचं डॉक्टर सांगतात आणि राज कावेरीच्या चेहऱ्यावर एकच आनंद पसरतो. तर आता पूर्णपने ठीक होऊन रत्नमाला घरी परतणार आणि वैदेही ने किडनी दिली आहे हे समजल्यावर त्यांची रिअक्शन काय असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

तर मालिकेतील व्हिलन मंडळी आता कोणता नवा डाव मांडून राज कावेरीला पुन्हा अडकवणार आणि राजकावेरी येणाऱ्या संकटाना कसे सामोरे जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Ratnmala health update)