कलर्स मराठी वाहिनीवर आलेल्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने चाहत्यांच्या मनात आपली जागा मिळवली. सोशल मीडियावरही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने काही दिवसांपूर्वी जान्हवीने तिच्या पेणच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती तिच्या सोशल मीडियावरुन दिली होती. त्यातच ही गोष्ट तिच्या आई-वडिलांना सगळ्यात आधी कळाली. ते पाहून तिच्या आईला पॅरालिसीसचा झटका आल्याचेही तिने यावेळी सांगितली.
या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने या सगळ्या घटनांची माहिती दिली. तिच्या या व्हिडीओला कॅप्शन देत तिने म्हटलं की, ‘आपण सर्वांनी सतर्क व जागरूक राहण्याची गरज आहे. हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा.’ जान्हवीच्या घरातल्या अनेक मौल्यवान गोष्टी चोरी गेल्या असल्याचे सांगितले. तसेच यावेळी तिने “माझ्या आईला या सगळ्या गोष्टींचा धक्का बसला आणि तिला पॅरालिसीसचा अटॅक आला. अजूनही ती रुग्णालयातच आहे” असंही म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे अभिनेत्रीच्या आईची तब्येत बरी व्हावी म्हणून अनेक चाहत्यांनी प्रार्थना केली होती.
अशातच आता जान्हवीने पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने तिच्या आईच्या तब्येतीची अपडेट दिली आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवीने असं म्हटलं आहे की, “नमस्कार मी जान्हवी किल्लेकर. नुकताच मी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये माझ्या आईला पॅरालिसीसचा अटॅक आल्याचे सांगितले होते. तेव्हापासून सर्व जण तिची काळजी करत आहेत. मला आईच्या तब्येतीबद्दल मॅसेज आणि कमेंट्स येत होत्या. तर आता आई बरी आहे. तिला तोंडाला फक्त पॅरालिसीस झालं आहे. पण ठीक आहे. आम्ही तिची काळजी घेऊ. ती एक खंबीर महिला आहे. लवकरच ती बरी होईल”.
दरम्यान, जान्हवीच्या पेणच्या घरातून चोरांनी बऱ्याचश्या मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. घरातले सगळे स्पीकर्स, तिच्या भावाची गिटार, वॉचचे कलेक्शन्स होते, हे सगळं चोरी गेलं आहे. तसेच आईच्या बऱ्याच साड्या चोरीला गेल्या आहेत.