बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अरमान मालिकला राग, रागाच्या भरात विशाल पांडेच्या मुस्काटात लगावली अन्…; ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 8, 2024 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 3, Armaan Malik slapped Vishal Pandey for commention on kritika malik

बायकोबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अरमान मालिकला राग, रागाच्या भरात विशाल पांडेच्या मुस्काटात लगावली अन्...; ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार?

‘बिग बॉस’ हा कायमच प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा शो आहे. यात येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे प्रेक्षक या शोचे चाहते आहेत. या शोमधील अरमान मलिक हा स्पर्धक आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहीला आहे. या शोमध्ये त्याच्याबरोबर त्याच्या दोन पत्नींदेखील सहभाग घेतला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्याची पहिली पत्नी पायल मलिक ही घराबाहर पडली. मात्र तिने नुकताच ‘वीकेण्ड का वार’मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तिने विशाल पांडेवर कृतिका मलिककडे वाईट नजरेने पाहण्याचा आरोप केला.

पायल मलिकने अनिल कपूरला सांगितले की, ‘बिग बॉस’मध्ये काय चालले आहे हे सांगण्यासाठी ती येथे आले आहे आणि ती खूप निराश आहे. विशाल पांडेशी बोलताना पायल म्हणाली की, “तुम्ही कॅमेऱ्यात काहीतरी बोललात जे माझ्या मते खूप चुकीचं होतं. तुम्ही कृतिकाबद्दल जे बोललात ते मला मान्य नाही. ती एक आई आणि एक पत्नी आहे आणि आपण तिचा आदर केला पाहिजे. तू कृतिकाबद्दल जे बोललास ते चुकीचे आहे.” पायल व अरमानसह शोचे होस्ट अनिल कपूर यांनी विशालला फटकारले.

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

अनिलने लवकेश कटारियाला विचारले असता, विशालने त्याला सांगितले की, “विशाल मला कृतिका भाभी खूप आवडतात” असं म्हटलं. यानंतर विशालने मी हे चुकीच्या पद्धतीने बोललो नसल्याचे सांगत राहिला. यावर पायल म्हणाली की, जर तो ‘दोषी’ नव्हता तर त्याने थेट कृतिकाला सांगण्याऐवजी लवकेशच्या कानात ही कुजबुज का केली?”

आणखी वाचा – “हे मी खपवून घेणार नाही”, लेकीने मुस्लिम धर्मात लग्न केल्यामुळे होणाऱ्या टिकेवरुन वडील शत्रुघ्न सिन्हा भडकले, म्हणाले, “कुटुंबावर होणारे हल्ले…”

पायल गेल्यानंतर अरमान विशालशी या प्रकरणाबद्दल बोलायला गेला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अरमानचा संयम सुटला आणि त्याने विशालला कानाखाली मारली. नंतर तो आरडाओरडा करताना दिसला. विशाल आणि अरमान दोघेही एकमेकांकडे धावण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण इतर स्पर्धक त्यांना एकमेकांपासून दूर ढकलत होते.

आणखी वाचा – गेली ४४ वर्षे करण जोहर देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “यावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण…”

दोघांच्या या बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात भांडणाची परवानगी नाही. कोणत्याही स्पर्धकाने असे केल्यास त्याला घराबाहेर हाकलून दिले जाते. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ अरमान मलिकवर काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Tags: Armaan malikbigg boss newsBigg Boss OTT 3Kritika MalikVishal Pandey
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Prasad Oak's 'Dharmaveer-2' movie first teaser released know more.

“ज्यांच्या घरातली स्त्री दु:खी...", ‘धर्मवीर-२’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, प्रसाद ओकच्या ‘त्या’ संवादाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.