बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१७ वर्षे माझा साथीदार…”, लाडक्या श्वानाच्या निधनानंतर बांदेकर कुटुंब दुःखात, सोहम भावुक होत म्हणाला, “आता माझ्यासोबत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 19, 2025 | 4:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Soham Bandekar's dog Simba passes away

सिंबाच्या निधनानंतर सोहम बांदेकरची भावुक पोस्ट

Soham Bandekar’s dog Simba passes away : मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध बांदेकर कुटुंब नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. नुकतेच अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याचा विवाह ‘येडं लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासह पार पडला. या लग्नसोहळ्याची चर्चा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीत या लग्नाची मोठी चर्चा रंगली होती. लग्नाआधीचे विधी, हळद, मेहंदीपासून ते भव्य रिसेप्शनपर्यंतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले.

मात्र, आता बांदेकर कुटुंबावर एक दुःखद प्रसंग ओढावला आहे. बांदेकर कुटुंबातील लाडका श्वान सिंबा याचं निधन झालं आहे. सिंबा हा सोहम बांदेकरचा केवळ पाळीव प्राणी नव्हता, तर त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग होता. सिंबा जवळपास १७ वर्षांचा होता आणि सोहमच्या आयुष्यात तो त्याचा खरा साथीदार होता. विशेष म्हणजे, सोहमची पत्नी पूजा बिरारी हिलाही सिंबाबद्दल खूप प्रेम होतं. त्यांच्या मेहंदी समारंभात पूजाने तिच्या हातावर सिंबाचं चित्र काढून घेतलं होतं, ज्यामुळे या दोघांचं सिंबा वर असलेलं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं होतं.

आणखी वाचा – “छबील-गोदोची आई आली…”, क्रांती रेडकरची ओळख नेमकी कशी आहे?, स्वतःच म्हणाली, “वानखेडेंची बायको…”

सिंबाच्या निधनाची बातमी स्वतः सोहम बांदेकर यांनी सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टद्वारे शेअर केली आहे. सिंबाचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, “माझ्या आयुष्यातील २८ वर्षांपैकी जवळपास १७ वर्षे माझा साथीदार, माझा रूममेट, माझा आधारस्तंभ, माझा समुपदेशक, माझा सर्वात मोठा पाठिंबा आणि माझ्या आयुष्यातील प्रेम आता माझ्यासोबत नाही. त्याने हा प्रवास सोडून देवांच्या सान्निध्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या प्रत्येक नि:स्वार्थ आणि निखळ प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तू नेहमीच आमच्यासोबत असशील.”

View this post on Instagram

A post shared by Soham Suchitra Aadesh Bandekar (@soham_bandekar_)

आणखी वाचा – मुलगा झाला हो! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

याच पोस्टमध्ये सोहमने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. “सिंबावर तुम्हा सगळ्यांनी भरभरुन प्रेम केलं. प्रत्यक्ष भेट न झाली तरी तुमचं प्रेम आणि जिव्हाळा त्याला नेहमी जाणवत राहिला. यासाठी आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो” असं भावनिक शब्दांत त्याने म्हटलं आहे. सिंबाच्या निधनामुळे बांदेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून, अनेक चाहते आणि कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोहम आणि बांदेकर कुटुंबीयांना धीर देत आहेत.

Tags: entertainment newspooja birarisoham bandekar emotionalSoham Bandekar's dog Simba passes away
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
 Prajakta Shisode exit reason

भाजीवालीची भूमिका करायला मराठी अभिनेत्रीच का?, 'तारक मेहता…' सोडण्यामागचं अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली, "भावनांचा आदर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.