बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या १० दिवसांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल आहे. सहा बहिणींभोवती फिरणार हे कथानक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना दिसतंय. चित्रपटातील कलाकाराच्या प्रत्येक पात्राचा वेगळेपणा हा नेहमीच चित्रपटाचा मुख्य कणा असतो. या सोबत चित्रपटाची वेषभूशा ही त्या पात्राला अधिक उठावदार बनवते. एखाद पात्र ठरल्यानंतर त्या पात्राचे सादरीकरण करेपर्यंत कसे अनेक पदर उलगडले जातात, त्या पात्राचा कसा बारकाईने अभ्यास केला जातो हे एक वेशभूषाकार उत्तमरीत्या मांडू शकतो. (Sukanya Mone Look Story)
बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी युगेशा ओंकार हिने सांभाळली होती. याबाबत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भाष्य केलं आहे. बाईपण भारी देवा चित्रपटातील म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोने यांनी साधना ही भूमिका साकारली.
पाहा सुकन्या मोने का घालतात एकच अंगठी (Sukanya Mone Look Story)

साधना (सुकन्या मोने) लूकमधील खास गोष्ट म्हणजे नटराजची अंगठी. नटराजाच्या अंगठीचा सुद्धा खास किस्सा आहे. ही अंगठी एरवी सुद्धा सुकन्या मोने यांच्या हातात असते. म्हणूनच ती सीनमध्ये वापरण्याचा निर्णय केदार शिंदे यांनी घेतला होता. “या निमित्ताने, सुकन्या मोने यांचं तरुणपणीचं पात्र साकारणाऱ्या त्यांच्याच लेकीसाठी म्हणजे ज्युलियासाठी त्यांनी हुबेहूब नटराज अंगठी बनवून घेतली होती.”(Sukanya Mone Look Story)
बाईपण भारी देवा मधल्या काकडे सिस्टर एकमेकांपासून अगदी वेगळ्या असून स्वभावानुसार त्यांच्या वेशभूषेतील बदल कळून आले. या चित्रपटात सुकन्या मोने या वर्किंग वुमन दाखवण्यात आल्या असल्या तरी त्या एका चौकटीत आयुष्य जगत असतात. साधनाचं आयुष्य हे खूप चौकटीत जगणारं आहे. वर्किंग वुमन असूनही ती स्वतंत्र नाही. (Sukanya Mone Look Story)
हे देखील वाचा – बॉक्स ऑफिसवर बाईपण ठरला भारी ! केला आणखी एक विक्रम
त्यामुळेच तिला चेक्स म्हणजेच चौकटीच्या पॅटर्नचे साडी व ब्लाउज व अगदी टिकलीही देण्यात आली होती. जेव्हा शेवटी मंगळागौरीच्या गाण्यात ती प्लेन (विना डिझाईन) साडी नेसते तेव्हा ती तिच्या चौकटी मोडून बाहेर पडताना दाखवली आहे. चित्रपटाच्या कथेनुसार त्यांची वेशभूषा बदलत जाते याचा उलगडा युगेशाने केला आहे.
