दिग्दर्शक केदार शिंदे यांचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची चर्चा केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातही होत असून प्रेक्षकांबरोबर अनेक हिंदी व इतर भाषिक चित्रपट समीक्षकही चित्रपटाचे भरभरून कौतुक करतायत. सोशल मीडियावरही चित्रपटातील गाणे, डायलॉग्सचे असंख्य रील्स व्हायरल होत असून सर्वत्र ‘बाईपण भारी…’ची चर्चा होतंय. (baipan bhari deva usa box office collection)
चित्रपटाने राज्यभरात कमाईचे अनेक विक्रम मोडलेले असताना आता विदेशातही चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली असून अमेरिकेतील बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलेलं आहे. अमेरिकेत या चित्रपटाने आतापर्यंत १०० हजार डॉलर्स म्हणजे भारतीय तब्बल ८२ लाखांहून अधिक रुपयांची कमाई केली असून जो ऐतिहासिक ठरला. विशेष म्हणजे, अमेरिकेत चित्रपटाचे ठराविक शोज असताना सर्व शोजना मिळालेला प्रतिसाद पाहता बऱ्याच ठिकाणी चित्रपटाचे शोज वाढवण्यात आले होते.
चित्रपटातील अभिनेत्रीने मानले प्रेक्षकांचे आभार (baipan bhari deva usa box office collection)
चित्रपटाला अमेरिकेत मिळालेल्या घवघवीत यशाच्या निमित्ताने चित्रपटातील सहकलाकार शिल्पा नवलकर यांनी चित्रपटाचा एक पोस्टर पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानलेत. तर याच पोस्टवर कमेंट करताना अभिनेत्री व सहकलाकार सुकन्या मोने यांनीही प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानलेत. शिल्पा यांच्या या पोस्टवर सेलिब्रिटीज व चाहत्यांनी कलाकार व टीमचे अभिनंदन केले. (shilpa navalkar post)
स्त्रियांच्या जीवनावर आधारित केदार शिंदे यांच्या अप्रतिम दिग्दर्शनाने, अप्रतिम संगीत व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांचा सुंदर अभिनयाने नटलेला या चित्रपटाचे लेखन वैशाली नाईक यांनी केलं असून जिओ सिनेमाज व माधुरी भोसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. (baipan bhari deva)
हे देखील वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं नाव आधी काय होतं? माहिती आहे का?