कलाकार मंडळींच्या अभिनयक्षेत्राहून जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांची ही उत्सुकता पूर्ण करायला ही कलाकार मंडळी नेहमीच काही ना काही शेअर करून त्यांच्या संपर्कात राहत असतात. सिनेसृष्टीतील अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी एकत्र कामाव्यतिरिक्त पार्टी करताना वा फिरायला जाताना दिसतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील काही महिला कलाकार फिरायला परदेशात गेले आसल्याचं समोर आलं आहे. (Baipan Bhari Deva Actress Foreign Trip)
परदेशवारी करतानाचे काही खास फोटो, व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बरेच महिने उलटून गेले आहेत तरी चित्रपटाबाबतची क्रेज अजूनही तितकीच आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवत अनेक हिट चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला. या चित्रपटात सहा बहिणींभोवती फिरणार कथानक दाखवण्यात आलं होतं.

कथानकाबरोबरचं चित्रपटातील कलाकारांचंही भरपूर कौतुक झालेलं पाहायला मिळालं. या चित्रपटात अभिनेत्री सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरलं. अशातच आता या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चित्रपटातील कलाकारांनी मिळून ट्रिप एन्जॉय करतानाचे काही खास व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत.

सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी या चौघीजणी परदेशवारी करण्यात व्यस्त आहेत. सध्या या चौघीजणी एकत्र थायलँड येथे फिरायला गेल्या आहेत. तेथे मज्जा-मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. सुचित्रा बांदेकर यांनी समुद्राजवळच्या एका रेस्टोरंटमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे, यांत त्या “पाहा, आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत”असं म्हणत सर्वांना क्रूजवर धमाल करताना दाखवत आहेत. सध्या या अभिनेत्री परदेशात एन्जॉय करत असून एकत्र क्वालिटी टाइम शेअर करत आहेत.