मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचा कार्यक्रम म्हणजे बिगबॉस. बिग बॉस मराठी असो वा बिग बॉस हिंदी हे शो कायम प्रेक्षकांच्या मनोरंजन यादीत अव्वल राहिले आहेत. बिगबॉस मराठीचा यंदाचा सिझन काही दिवसांपूर्वी निकालात लागला अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. परंतु हिंदी बिग बॉसचा अवधी वाढवल्यामुळे बिग बॉस हिंदीचं हे पर्व अजून चालू आहे. बिग बॉस हिंदीच्या या पर्वात मराठी बिग बॉस विजेता मराठमोळा शिव ठाकरे सध्या हे पर्व गाजवताना दिसतोय. शिवचा स्वभाव प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला दिसून येत आहे. ट्विटर वर विजयी भाव शिव हॅशटॅग्स मिलियन मध्ये ट्रेंडिंगवर आहेत. तर शिवच्या चाहत्यांनी काही दिवसांपूर्वी एक भव्य रॅली काढत शिवला पाठींबा दर्शवला होता.(shiv thakare)
हे देखील वाचा – ‘महाराष्ट्र शाहीर’ यांचं हे गाणं राज्यगीत म्हणून जाहीर
शिव ठाकरे त्याच्या मुत्सद्दी गेम साठी प्रसिद्ध आहेच सोबतच प्रसिद्ध रॅपर MC stan आणि शिवच्या मैत्रीला ही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. बिग बॉस हिंदीच यंदाचं पर्व आता शेवटच्या काही दिवसात येऊन ठेपलं आहे. लवकरच या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पर्व आपल्या मेहनतीने नॉमिनेशन मध्ये न येणारा शिव शेवटच्या नॉमिनेशन कार्यात नॉमिनेट झाला आहे. त्यामुळे शिवच्या चाहत्यांनी चांगलीच कंबर कसल्याच दिसून येत आहे.(shiv thakare)

शिवला पाठिंबा देण्यासाठी सामान्य प्रेक्षकांसोबतच हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनी सुद्धा पुढाकार घेतलेला दिसत आहे. बिग बॉस मराठी मधील काही पूर्व सदस्यांनी शिवच्या खेळाला सुरुवातीपासूनच नावाजलं आहे. कलाकारांना सोबतच आता राजकारण क्षेत्रातून सुद्दा शिवला सपोर्ट असल्याचा समोर आलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी शिवचा पानटपरी सोबतच फोटो सोशल मीडिया वर शेअर करत लिहिलं आहे “अतिशय सामान्य कुटूंबातुन अमरावतीयेथील शिव ठाकरे, बिग बॉस हिंदीच्या फायनल पर्यंत पोहचला आहे. शिव ठाकरे ला वोट करण्यासाठी voot app डाऊनलोड करा व वोट करा…” शिव बिग बॉस हिंदीची ट्रॉफी जिंकणार का? या बद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.(shiv thakare)