Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide: कलाकार मंडळी उत्तम अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. पण पडद्यावर सुंदर दिसणारं चित्र पडद्यामागून साकारणारेही उत्तम कलाकाराचं असतात. या कलाकारांपैकीच महत्त्वाचं मानलं जाणारं नाव म्हणजे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई. नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. एबीपी माझाच्या वृतानुसार, नितीन देसाई यांनी उभारलेल्या एन. डी. स्टुडिओमध्येच आत्महत्या केली आहे.
नितीन देसाई यांच्या जाण्याने हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे. दरम्यान नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.
नितीन देसाई दोन दिवसांपासून ते एन. डी. स्टुडिओमध्येच होते, त्यांची कामही सुरूच होती. दरम्यान आज सकाळी त्यांनी कोणाच्याही कॉल्सला उत्तर दिलं नाही. त्यांनतर कर्मचाऱ्यांनी एन. डी. स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं. तेव्हा नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. (Nitin Desai Suicide)
नितीन देसाई यांनी उभारलेल्या एन. डी. स्टुडिओमध्ये अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचं तसेच मालिकांचं देखील शुटिंग करण्यात आलं आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, यांसारख्या अनेक चित्रपटांचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केले होते. विशेष म्हणजे बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांसाठी सुद्दा त्यांनी सेट उभारले होते. चित्रपटांसोबतच मालिकांचं शूटिंग सुद्धा एन. डी. स्टुडिओ केलं जात होतं. (Nitin Desai commits suicide)
अनेक चित्रपट, मालिका यांचं शूटिंग झालेल्या आणि नितीन देसाई यांनी उभारलेल्या एन.डी. स्टुडिओला काही दोन वर्षांपूर्वी भीषण आग देखील लागली होती. एका चित्रपटाच्या शुटींगसाठी उभारण्यात आलेल्या सेटवर अचानक आग लागली आणि यामध्ये सेट सोबतचं स्टुडिओचं देखील नुकसान झालं होत.(nitin desai death news in marathi)