गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर मृण्मयी देशपांडेच्या नवऱ्याने केली कांद्यांची शेती, कांदे कापणीचा फोटो शेअर करत दाखविली झलक, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 25, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande Husband Farming Photo

महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर मृण्मयी देशपांडेच्या नवऱ्याने केली कांद्यांची शेती, कांदे कापणीचा फोटो शेअर करत दाखविली झलक, म्हणाला…

मराठी सिनेविश्वातील बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी अभिनयासह जोडधंदा, आवड वा विरंगुळा म्हणून इतर व्यवसायात विशेष लक्ष देतात. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी अभिनयासह स्वतःचा असा नवा व्यवसाय सुरु केला आहे. तर काहींनी व्यवसाय वा आवड म्हणून शेती करायलाही सुरुवात केली आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या पतीबरोबर शेती हा व्यवसाय सुरु केला. महाबळेश्वर येथे फार्महाउस घेत ही जोडी तेथे शेती करु लागली आहे. ही अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. (Mrunmayee Deshpande Husband Farming Photo)

मृण्मयीने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.सोशल मीडियावरही अभिनेत्री नेहमीच सक्रिय असते. कायम काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. विशेषतः मृण्मयीचे तिच्या बहिणीबरोबरचे म्हणजेच गौतमीबरोबरचे बॉण्डिंग प्रेक्षकांना भावतं. देशपांडे सिस्टर्सची धमाल मस्ती नेहमीच चाहते सोशल मीडियावरुन एन्जॉय करतात.

आणखी वाचा – “राजकारण्यांनी पैसे खाल्ले अन्…” सध्याच्या राजकारणावर अवधूत गुप्ते स्पष्टच बोलला, म्हणाला, “ही सामान्य माणसांची चूक…”

View this post on Instagram

A post shared by Swapnil Rao (@swapnilrao11)

मृण्मयी बहिणीबरोबच्या गमतीशीर व्हिडीओसह तिच्या फार्महाऊसमधीलही फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा नवरा स्वप्निल राव या दोघांनी मिळून महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात एक छोटसं घर बांधलं आहे. त्यांचं हे ड्रीम होम पूर्ण झाल्यानंतर दोघांनी तिथे शेती करायला सुरुवात केली. स्वतःसाठी लागणारे अन्न, फळभाज्या यांचं पीक ते घेतात. मृण्मयी व स्वप्निल यांनी शेतीविषयक माहिती देतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. मोकळी हवा, स्वत:साठी स्वत:च उगवलेलं अन्न, शहराबाहेरील शांतता आणि साधं राहणीमान या साऱ्याचा आनंद सध्या मृण्मयी घेताना दिसत आहे.

आणखी वाचा – लग्नाला दोन महिने पूर्ण होताच प्रथमेश परबने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा, म्हणाला, “पडद्यावर आयुष्य घडतं तसा हा आंतरपाट…”

अशातच मृण्मयीचा नवरा स्वप्नील याने त्यांच्या शेतात कांद्याची शेती केली आहे. कांद्यांची कापणी केल्यानंतर त्याने एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती शेअर केली आहे. “आमच्या कांद्याची कापणी सुरु झाली आणि कापणीमुळे खूप आनंद झाला. येत्या काही महिन्यांसाठी कांद्याचे चांगुलपण”, असं म्हणत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.

Tags: marathi actressmrunmayee deshpandeMrunmayee Deshpande HusbandMrunmayee Deshpande Husband Farming Photo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Piyush Ranade shared a special post for Suruchi Adarkar's birthday

"माझ्या सर्व चुका, कमतरता अन्...", लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवशी पियुष रानडेची खास पोस्ट, सुरुचीबद्दल व्यक्त होत म्हणाला, "माझ्यावर प्रेम केलं तसं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.