शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Atul Parchure Death : “आमचा जवळचा मित्र गेला…”, अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे भावुक, राजकीय मंडळीही हळहळली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 15, 2024 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actor Atul Parchure Died

अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे भावुक

Actor Atul Parchure Died : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. कर्करोगावर मात करुन ते अतिशय जिद्दीनं उभे राहिले होते. मात्र गेल्या पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. गेले दोन आठवडे अतुल यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर काल त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं अचानक निघून जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे. कलाविश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रालाही अतुल परचुरे यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. राजकीय क्षेत्रातील राज ठाकरे यांनी अतुल परचुरेंबाबत एक पोस्ट लिहिली आहे. तर याशिवाय सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, एकनाथ शिंदे या राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींनीही अतुल यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “आज आमचा अतुल गेला. एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी. शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे. तो त्या काळात बजरबट्टू नावाच्या नाटकात काम करायचा . शाळेत असताना पण तो उस्फुर्त आणि उमदा नट. अतुल हा जन्मजात अभिनेता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शाळेत असताना त्याची व माझी फारशी मैत्री नव्हती. पण आमच्यासाठी तो तेव्हाच एक सेलिब्रिटी होता. कॉलेजला गेल्यावर जरी आमचे कॉलेज वेगळे होते तरी आमची मैत्री झाली आणि ती घट्ट पण होत गेली. अतुल हा खरा रंगकर्मी. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांमध्ये अतुलने जे काम केलं ते अफाट होतं. बरं अतुल इतका नशीबवान अभिनेता की, त्याचं व्यक्ती आणि वल्ली मधलं काम पु.ल. देशपांड्यांनी फक्त पाहिलं नाही तर त्याला दाद देखील दिली”.

आणखी वाचा – Atul Parchure Death : अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “मी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा अतुलने पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म देखील भरला होता. तेव्हाच्या राजकीय परिस्थितीत एखाद्या कलाकाराने असं पाऊल उचलणं हे धाडस होतं, पण ते त्याने दाखवलं. तो पुढे माझ्या कुटुंबाचा भाग बनला होता. कायम आनंदी, जरा जास्तच गुटगुटीत असा हा आमचा मित्र, ज्यावरुन मी त्याला कायम चिडवायचो, असा अतुल जेव्हा कर्करोगाशी झुंज देऊन बाहेर आला, आणि जेव्हा तो खंगला होता, तेव्हा तो आमच्या मित्रांपैकी कोणालाच बघवत नव्हता. पण अशा अवस्थेत सुद्धा तो आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता”.

आणखी वाचा – आजारपणामध्ये अशी होती अतुल परचुरे यांची अवस्था, पत्नीने सांगितली होती सत्य परिस्थिती, आवाजही गेला होता अन्…

“मी म्हणलं तसं अतुल हा प्रतिभावान कलावंत होता आणि वृत्तीने आनंदी होता. त्याने मराठी, हिंदी चित्रपट केले, टीव्ही मालिका केल्या, हिंदीत पण त्याने अनेक टीव्ही शो केले पण अतुल हा खरा रंगकर्मी. त्याचा रंगमंचावरचा वावर, त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा असलेला सेन्स सगळंच अप्रतिम होतं. अभिनयावर कमालीचं प्रेम असलेल्या अतुलने अकाली एक्झिट घेतली, पण जाताना रंगभूमीपासून, सर्व मित्रांच्या आयुष्यातलं काही तरी निखळलं ही भावना ठेवून गेला”.

Tags: Actor Atul Parchure Diedatul parchure deathraj thackeray post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Atul Parchure Death Sharad Ponkshe, Kshitij Patwardhan, Saie Tamhankar shared sad post

Atul Parchure Death : काळ सरकत जातो, आठवणी पुसट होतात पण…; अतुल परचुरेंच्या निधनाने हळहळले सिनेविश्व

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.