शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अतुल परचुरेंना शेवटचे पाहताना ढसाढसा रडल्या सुप्रिया पाठारे, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 15, 2024 | 12:32 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Atul Parchure Death Marathi actress Supriya Pathare present for last rites sad video viral

अतुल यांच्या जाण्याने सुप्रिया यांना अश्रु अनावर, भावुक व्हिडीओ व्हायरल

मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.  मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. यावर त्यांनी यशस्वी मात करत रंगभूमीवर पुनरागमनदेखील केले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली. (Atul Parchure Death)

अतुल यांच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय मोने, निर्मिती सावंत, सुनील बर्वे यांसह अनेक कलाकार मंडळी त्यांच्या निधनावर रडताना पाहायला मिळत आहे. अशातच सुप्रिया पाठारेदेखील अतुल यांच्या निधनावर दु:खी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अतुल व सुप्रिया यांनी ‘जागो मोहन प्यारे’मध्ये एकत्र काम केले होते. तसंच अतुल यांनी सुप्रिया यांचं ‘तू तू मी मी’ हे नाटक बघितलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Atul Parchure Death : सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

त्यानंतर काही कार्यक्रम व पुरस्कार सोहळ्यांना त्यांची भेट व्हायची. त्यामुळे आता अतुल यांच्या जाण्याने सुप्रिया यांना अश्रु अनावर झाले आहेत.  अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दुःख व्यक्त केले.

आणखी वाचा – Atul Parchure Death : अतुल परचुरेंना अखेरचा निरोप देताना रडल्या निवेदिता सराफ, उपस्थितांचेही डोळे पाणावले, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आज (मंगळवार १५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता अतुल यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांना अखेरचं पाहण्यासाठी कलाकारांनी गर्दी केली आहे. यावेळी सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुबोध भावे, मंदार देवस्थळी, भारत गणेशपुरे, प्रदीप वेलणकर, अरुण कदम, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे यांसह अनेक कलाकार मंडळी उपस्थित आहेत.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Actor Atul Parchure Passes Away

Atul Parchure Death : सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.