शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गणरायाच्या दर्शनासाठी अर्पिता खानच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सलमान खानसह काढले फोटो, सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 21, 2023 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Salman Khan And Eknath Shinde

गणरायाच्या दर्शनासाठी अर्पिता खानच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सलमान खानसह काढले फोटो, सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. सर्व सामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण गणेशाची भक्तिभावाने आराधना करतोय. सर्वत्र गणरायाच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. या उत्साहाच्या वातावरणाचा आनंद सगळ्यांच्या लाडक्या सलमान खानने ही घेतला आहे. सलमान खानने त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. आता मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूडकरांनाही गणेशोत्सवाची भुरळ पडली आहे. (Salman Khan And Eknath Shinde)

बरं यावेळी सलमान खान एकटाच अर्पिताच्या घरी दर्शनाला गेला नाही आहे. सलमान खान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अर्पिताच्या घरी दर्शनास पोहोचले आहेत. दरम्यान अर्पिताच्या घराबाहेरील सलमान खान व एकनाथ शिंदे यांचे एकत्र पोज देतानाच फोटोस सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. सलमान व एकनाथ शिंदेचे अनेक फोटो व व्हिडीओ पापाराझींद्वारे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. यावेळी सलमानने काळी पँट व निळा शर्ट परिधान केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांढऱ्या रगांचे कपडे परिधान केले होते.

आणखी वाचा – गणेशोत्सवानिमित्त हार्दिक जोशीची स्पेशल पोस्ट, बाप्पाचा फोटो शेअर करत म्हणाला, “बायकोचा पहिला…”

सलमान खानच त्याची बहीण अर्पिता खानवर विशेष प्रेम आहे. तो कायमच तिच्या आनंदाच्या व दुःखाच्या वेळी तिच्याबरोबर असतो. सलमान खानने त्याची बहीण अर्पिता खानच्या सासरी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. अर्पिता खान ही आयुष शर्माबरोबर विवाहबंधनात अडकली.

आणखी वाचा – राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी

बॉलिवूडकर ही आता गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना दिसतात. शिल्पा शेट्टी, सलमान खान, शाहरुख खान, कार्तिक आर्यन, सारा अली खान यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाचे दर्शन घेताना दिसत आहेत, तसेच अनेक कलाकार मंडळींनी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरी आगमन झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.

Tags: arpita khanayush sharmacm eknath shindeeknath shindeentertainmentsalman khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Hemangi Kavi New Ad

"पण चाय से ज्यादा किटली गरम कारण…", युवराज सिंगबरोबर काम केल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, "तो सेटवर येताना प्रचंड…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.