कलाकार मंडळी म्हटलं की त्यांचं बहुतेकदा कुटुंब ही कलाक्षेत्रात कार्यरत असत. बरेचदा वारसा चालवत ही कलाकार मंडळी सारखंच क्षेत्र निवडतात. आज मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच उदाहरने आहेत ज्यांच्या पिढ्यान पिढ्या या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, आदेश बांदेकर अशी बरीच नाव आहेत ज्यांचं कुटुंब सिनेसृष्टीत आहे. यांत आणखी एक नाव आवर्जून घेता येईल ते म्हणजे सराफ कुटुंब. निवेदिता सराफ या लग्नाआधी जोशी होत्या, आणि निवेदिता यांच्या माहेरीही कलेचा वारसा हा होताच. निवेदिता यांचे वडील गजन जोशी हे देखील अभिनयक्षेत्रात होते, त्यांच्यानंतर त्यांच्या लेकीने हा वारसा पुढे चालवला.(Ashok Saraf Shares Incident)
गजन जोशी आणि निवेदिता सराफ यांचा एक किस्सा अशोक मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात सांगितला आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.
अशोक सराफ यांचं डार्लिंग डार्लिंग हे नाटक नेहमीच चर्चेत राहील. आजही या नाटकाला रसिक विसरले नाही आहेत. या नाटकाची हाऊसफुल गर्दी आणि नाटकांची रंगत त्यावेळी कधीच कमी झालेली नव्हती. रेकॉर्डब्रेक या नाटकात अशोक सराफ आणि गजन जोशी यांनी एकत्र काम केलं होत. गजन जोशी आणि अशोक सराफ यांचं मैत्रीपूर्व नातं आहे.
पाहा निवेदिताबद्दल अशोक सराफ काय म्हणाले होते (Ashok Saraf Shares Incident)
डार्लिंग डार्लिंग या नाटकाने स्लॅपस्टिक कॉमेडीचा ट्रेंड सुरु केला असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आहे. डार्लिंग डार्लिंग या नाटकातील राजा गोसावी आणि अशोक सराफ हे कॉम्बिनेशन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलं. या नाटकात निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांनीही काम केलं आहे. (Ashok Saraf Shares Incident)
याबाबत बोलताना अशोक मामांनी सांगितलंय की, या नाटकामध्ये गजन जोशी म्हणजेच निवेदिताचे वडीलही, काम करायचे. माझा मित्र होता तो. शिवाजी मंदिरच्या एका प्रयोगाला निवेदिता आली होती. वयानं छोटी होतीच, पण दिसायलाही लहानखोर. गजा म्हणाला, ही माझी मुलगी. तुला भेटायला आलीये. मला काय माहित पुढे ती माझी बायको होणार आहे आणि हा माझा सासरा!
हे देखील वाचा – इंटिमेट सीनपूर्वी त्याने मासिक पाळीची तारीख विचारली -अमृता सुभाषने सांगितला अनुभव
निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्यात वयाचं अंतर अधिक असूनही त्यांचा उत्तम संसार सुरु आहे.
