अभिनयाचं वारं ज्याच्या अंगी भिनल त्या कलाकाराची मजबूत बाजू ही अभिनय आणि कमकुवत बाजू ही अभिनयचं असतो. कलेला अग्रस्थानी ठेऊन कलेशी नाळ जोडून राहिलेले मराठी इंडस्ट्रीतील महानायक अभिनेते अशोक सराफ. पांडू हवालदार ते अगदी हल्लीच ‘वेड’ मधील छोट्या झलकेने वर्षे गेली तरी विनोदाची वेळ अजून तिचं अगदी जिथं हवी तिथे याची जाणीव मामांच्या अभिनयातून होते. संपूर्ण मनोरंजन विश्व अशोक सराफ याना मामा म्हणून ओळखत. आजही ठराविक घटकांना विचारलं की तुमच्या आवडत्या कलाकारांच्या यादीतील एखादं नाव सांगा तर हक्काने अशोक मामा असं सांगितलं जात.(Ashok saraf Rajabhau paranjpe)

फक्त प्रेक्षकच नाही तर शून्यापासून कला सुरु करणारे ते यशाच्या शिकरावर असणारे कलाकारही अशोक सराफ यांच्या अभिनयाचे, कलेचे फॅन्स असल्याचं दिसून येत. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मामांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. धुमधडाका, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमधून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर निखळ हसू उमटवल. कलाकाराच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक गोष्ट बरीच मदत करते ती म्हणजे कौतुकाची एक थाप किंवा कधी कधी एक ओळ ही. आयुष्यातील अशाच एका किमती कौतुकाची कहाणी अशोक सराफ यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.(Ashok saraf Rajabhau paranjpe)

कौतुकाची गोष्ट सांगताना मामा म्हणाले त्यांच्या पांडू हवलदार या चित्रपटाचा पुण्यातील अलका टॉल्किझमध्ये सिल्वर जुबुली कार्यक्रम होता इंटर्वल मध्ये मामा व्हरांड्यात चालत होते तेव्हा त्यांना एक गृहस्थ बसलेले दिसले त्यांना पाहून मामा त्यांच्या जवळ गेले २ मिनट थांबून मामांनी ‘नमस्कार राजाभाऊ’ म्हणत त्या गृहस्थांना प्रणाम केला. मामांनी प्रणाम केलेले ते गृहस्थ होते सुप्रसिद्ध दिगदर्शक, लेखक, अभिनेते, निर्मातेअशा सर्व घटकांवर अधिराज्य असणारे ‘राजा दत्तात्रय परांजपे’ उर्फ ‘राजाभाऊ परांजपे’.
====
हे देखील वाचा – मालिकेच्या कलाकारांसोबतच प्राण्यांना सुद्धा आपुलकीने जपणारा निर्माता..
====
राजाभाऊ परांजपेंनी केलं मामाचं कौतुक
मामांनी सांगितलं राजाभाऊंनी तेव्हा दिगदर्शन करणं थांबवलेलं अशोक सराफ यांना बघून राजाभाऊ म्हणाले ‘ तुम्ही खूप उशिरा आलात.या इंडस्ट्रीत’ पुढे मामा म्हणाले राजाभाऊ ना सांगायचं होतं तुम्ही मी चित्रपट दिगदर्शित करताना का नाही आलात खूप उशीर केलात या क्षेत्रात येण्यासाठी. राजाभाऊंची ती कौतुकाची काही वाक्य ऐकून मामा चांगलेच भावुक झाले होते. आयुष्यातील काही बेस्ट कौतुकांच्या यादीत या कौतुकाच्या शब्दांना नक्कीच मानाचं स्थान असेल.

राजाभाऊ परांजपे यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट मनोरंजनाची मेजवानी म्हणून प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केले. हिंदीतील ‘मेरा साया’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. हिंदीत तुफान गाजलेला हा चित्रपट राजभाऊ यांच्या मराठीतील ‘पाठलाग’ या चित्रपटाचा रिमेक होता.