‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अप्पीला फोन येतो की, काही लोक गडावर अडकले आहेत, त्यामुळे प्रशासनाकडे त्यांनी मदत मागितलेली आहे. त्या क्षणाला कसलाही मागचा पुढचा विचार न करता अप्पी थेट कार्यालयात जायचं ठरवते आणि स्वतः या प्रकरणात लक्ष द्यायचं ठरवते. अप्पी जात असते तेव्हा अर्जुनही तिच्या मदतीला म्हणून जातो. अर्जुन सांगतो पोलीस असून माझं सुद्धा हे कर्तव्यच आहे. तिकडे सगळेजण ऑफिसमध्ये पोहोचल्यावर गायतोंडे यांच्या मदतीने अप्पी तिथे अडकलेल्या तरुणांना फोन लावते आणि त्यांना धीर देते. (Appi Amchi Collector Serial Update)
ते पाहून अर्जुन म्हणतो की, जिकडे सगळ्यांची विचार करण्याची क्षमता संपते तिथे ही विचार करु लागते. तिचा हाच गुण मला फार आवडतो आणि कसलाही विचार न करता कुणाच्याही मदतीशिवाय ती या प्रकरणात लक्ष देत आहे. ही एक कौतुकास्पदच बाब आहे. तर इकडे अर्जुन अप्पीचं भरभरून कौतुक करत असतो. त्यावेळी तो असाही विचार करतो की, गेली सात वर्ष अमोलला अप्पीने एकटीने वाढवले त्यामुळे ही सुद्धा एक कौतुकाचीच बाब आहे. तर इकडे रुपारी आर्याला फोन करुन सांगते की, तू तातडीने कार्यालयात जा तिथं एमर्जेंसी आली आहे त्यामुळे अप्पी व अर्जुन एकत्र कामावर निघाले आहेत.
हे ऐकल्यावर इकडे अखेर तरुणांना मदत मिळाल्यानंतर अप्पीला बरं वाटतं. त्यानंतर गायतोंडे अप्पीचं कौतुक करतात तर अर्जुनही अप्पीचं कौतुक करतो. गायतोंडे व अर्जुन बोलत असतात तेव्हा अर्जुनच्या तोंडून अप्पीचं कौतुक ऐकून आर्याला फार वाईट वाटतं तेव्हा आर्या काहीच बोलत नाही मात्र मनातला राग व्यक्त करत असते. त्यानंतर ती अप्पीबद्दल अर्जुनसमोर वाईट बोलते तेव्हा अर्जुन आर्यावर चिडतो. आणि तिला कामाची जाणीव करुन देतो. तर इकडे घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी अर्जुन अप्पी साठी काही फुलं घेऊन येतो आणि एक नोट लिहून ठेवतो. हे सगळं काही रूपाली आणि अमोल पाहतात.
अर्जुन भावोजींच्या अप्पी जवळ जाऊ लागली आहे हे पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर इकडे अर्जुन सात वर्षे अमोलला अप्पीने एकटीने वाढवले त्या वेळेला तुला सोबतीची गरज असतानाही तू खंबीर राहिलीस यासाठी तिचे आभार मानतो आणि तिला सॉरी असं म्हणतो. आता मालिकेच्या पुढील भागात रूपाली आर्या मिळून अप्पी व अर्जुनला वेगळे करण्यासाठी कोणते नवे डाव आखणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.