सध्या अभिनेता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता या चित्रपटाचा दूसरा भाग म्हणजेच ‘धर्मवीर २’ची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. मुंबईमधील वरळी येथे हा ट्रेलर लॉंच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. अशोक सराफ, महेश कोठारे, सलमान खान, गोविंदा अशा स्टार्सच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्याला प्रसाद ओकने ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं सादर केलं.
यावेळी प्रसाद ओक धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत होता. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर येत प्रसादच्या गळ्यात हार घालत असतात. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसादच्या पाया पडत असतात. पण तेव्हा प्रसाद त्यांना अडवत त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो. प्रसादने केलेल्या या कृतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याच सोहळ्यानिमित्त प्रसादने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला असून त्याने याबद्दल एक खास पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा – मेहनत केल्यास यश हमखास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक आहे, जाणून घ्या…
या पोस्टमध्ये प्रसादने असे लिहिले आहे की, “काल गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘धर्मवीर २’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादांनी, माझ्या अत्यंत जवळच्या लोकांच्या आणि अनेक गुरुतूल्य व्यक्तींच्या उपस्थितीने हा सोहळा अजूनच देखणा झाला. मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाफ्याचा हार स्वीकारताना दिघे साहेबांच्या पाठीवर असलेल्या हाताची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षानी झाली. या अनमोल क्षणांसाठी ‘धर्मवीर’च्या संपूर्ण संचाचे मनःपुर्वक आभार मानतो”.
प्रसादने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ट्रेलर लाँच सोहळ्याच्या तयारीपासून ते सोहळा पार पडलेल्या लाँचकहा प्रत्येक खास क्षण शेअर केला आहे. प्रसादच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच पूजा सावंत, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ जाधवसह अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत आणि ‘धर्मवीर २’ या चित्रपटाबद्दल उत्सुकताही व्यक्त केली आहे.