मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे नारकर कपल. ९० दशकापासून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या चिरतरुण कपलच्या अभिनयाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी त्यांचा ५०वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्या यांचा जन्म ८ डिसेंबर १९७४ साली झाला. आस्क मी सेशन’मध्ये अभिनेत्रीने एका चाहत्याला वय आणि जन्मतारीख सांगितली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. याची खास झलक सोशल मीडियावर त्यांनी शेअर केली होती. (Aishwarya Narkar Birthday Celebration)
ऐश्वर्या नारकर सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहेत. यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांना मालिकेतीळ कलाकारांनीही खास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर कलाकारांनी खास सेलिब्रेशन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील कलाकारांनी त्यांच्यासाठी खास सरप्राइज प्लॅन केलं होतं. याची झलक तितीक्षा तावडेने तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा व मालिकेतील इतर कलाकारांनी ऐश्वर्या यांचा वाढदिवस कसा साजरा केला याचे खास पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला “ऐश्वर्या ताईंचा पन्नासावा वाढदिवस आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवसाचे खास प्लॅनिंग केलं आहे” असं म्हणते. त्यानंतर सेटवर जात सर्वांना ती “ऐश्वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सरप्राइज द्यायचं आहे तर कुणी त्यांना काही सांगू नका” असंही म्हणते. त्यानंतर ते ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात. यावेळी अभिनेत्री अमृता रावराणे त्यांच्यासाठी पूर्ण व्हॅनिटी सजवते. त्यानंतर ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सर्वजण त्यांना सरप्राईज देतात. हे खास सेलिब्रेशन पाहून ऐश्वर्या नारकरही भारावून जातात. यावेळी अनेकजण त्यांना शुभेच्छाही देतात.
दरम्यान, ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘श्रीमंताघरची सून’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. छोट्या पडद्यावर त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. उत्तम अभिनयाप्रमाणेच ऐश्वर्या नारकर त्यांच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखल्या जातात. नियमित योगा करून फिट राहण्याचा सल्ला त्या सर्व चाहत्यांना देत असतात.