शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमोलच्या ‘त्या’ निर्णयामुळे सर्वांचं आयुष्य बदलणार?, नेटकऱ्यांकडूनही लाडक्या सिंबाचं कौतुक, लक्षवेधी प्रोमो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector serial update Amol will tell Arjun about about adopting a son for Amol and Rupali

रुपाली व स्वप्नील यांच्यासाठी मुलगा दत्तक घेण्याची कल्पना सर्वांचं आयुष्य बदलू शकेल का?

काही मालिका पात्र प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मालिकेतील पात्र आपल्याच घराचा भाग असल्याचा प्रेक्षक सांगतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अमोलच्या आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी अमोलच्या सगळ्या इच्छा आणि हट्ट सगळे पूर्ण करत आहेत. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे.

अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये एक मुलगा दवाखान्यात असं म्हणतो की, “माझ्याबरोरबर् आता कोण नाहीये, माझं अॅडमिशन करुन घ्या”. त्यानंतर तिथे अमोलचे कका-काकी येतात आणि असं म्हणतात की, “काय झालं काही प्रोब्लेम आहे का?”. तेव्हा दवाखान्यातील महिला त्यांना असं म्हणते की, “या लहान मुलाच्या जबाबदारीपत्रावर सही करायला कुणी नाही. त्यामुळे आता आम्ही काय करावं हा प्रश्न पडला आहे”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “बुरखा घाल, नमाज पठण कर”, शाहरुख खानने पत्नी गौरीकडे केली मागणी, कुटुंबियांनाही बसला धक्का, नेमकं काय झालं?

यानंतर रुपाली आणि स्वप्नील दवाखान्यातील त्या महिलेला असं म्हणतात की, “आम्ही सही केली तर चालेल का?” यावर ती महिलादेखील उत्तर देत “हो” असं म्हणते. त्यानंतर अमोलच्या चेहऱ्यावर हास्य उमलते आणि त्याच्या डोक्यात  रुपाली व स्वप्नील यांच्यासाठी मुलगा दत्तक घेण्याचा विचार येतो. त्यानंतर हीच गोष्ट अमोल अर्जुनला सांगतो. याबद्दल तो अर्जुनला असं म्हणतो की, “मोठ्या आई-बाबाकया आनंदासाठी काय तरी करायला पाहिजे. त्यांच्याशी बोलून त्यांच्यासाठी मुलगा दत्तक घेतला तर?”.

आणखी वाचा – “मनोरंजन क्षेत्रात करिअर का करत नाही?”, लोकांच्या प्रश्नावर प्रथमेशच्या बायकोचं उत्तर, म्हणाली, “चर्चेत राहणं…”

त्यामुळे आता अमोलचा हा निर्णय अर्जुनला पटणार का? त्याच्या या कल्पनेला रुपाली आणि स्वप्नील तयार होणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसंच अमोलची ही कल्पना सर्वांचं आयुष्य बदलू शकेल का? हेही प्रेक्षकांना पुढील भागात पाहायला मिळणार आहे.

Tags: appi amchi collector marathi tv serialAppi Amchi Collector Serial Updateappi amchi collector zee marathi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra show will soon be make Guinness Book of World Records makers said the reason

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची गिनीज बुकमध्ये नोंद होणार, निर्मात्यांनी सांगितलं कारण, म्हणाले, “लवकरच..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.