शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई-बाबांना एकत्र आणण्यासाठी अमोलचे प्रयत्न, तर अर्जुनच्या वडिलांचीशीही झाली भेट, सात वर्षांचा दुरावा संपणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जून 11, 2024 | 11:48 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Appi amchi collector serial update Amol is trying to bring parents together.

आई-बाबांना एकत्र आणण्यासाठी अमोलचे प्रयत्न, तर अर्जुनच्या वडिलांचीशीही झाली भेट, सात वर्षांचा दुरावा संपणार का?

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अप्पी व अर्जुन हे सात वर्षांनी आता पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचं चित्र दिसत आहे. काही कारणांनी हे दोघे वेगळे  झाले होते, मात्र आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सिंबामुळे अप्पी-अर्जुन एकत्र येतानाचे पाहायला मिळत आहे.

अप्पी अमोलपासून अर्जुनच त्याचा बाबा असल्याचे लपून ठेवते. मात्र अर्जुनच  आपला बाबा असल्याचे सत्य आता अमोलला समजलं आहे. शिवाय बाबांच्या घरच्यांची आणि त्याच्या माँची भांडणं झाली असल्याचेही अमोलला कळले आहे. त्यामुळे आता या दोन्ही घरांना एकत्र आणण्यासाठी अमोल स्वतः कष्ट घेताना दिसत आहे.  मालिकेत नुकताच अर्जुन व आर्याचा साखरपुडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता अप्पीने अर्जुनविषयीच्या सर्व आशा सोडून दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशातच आता या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. हा नवीन प्रोमो सध्या सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये अप्पीके बाबा अमोलला अर्जुनच्या वडिलांशी भेट घडवून आणण्यासाठी भेटतात. यावेळी अर्जुनचे वडील अमोलला त्यांच्या घरी येण्याविषयी बोलतात. तेव्हा अमोल त्यांना उत्तर देत असं म्हणतो की, “मी अप्पी व बाबांबरोबर घराच्या बाहेर पडलो होतो. तर मी त्यांना घेऊनच घरी येणार आहे.”

आणखी वाचा – नेत्रा आई होणार असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीय आनंदी, पण ही बातमी विरोचकापर्यंत पोहोचू न देण्याचे घरच्यांचे प्रयत्न

तसेच यापुढे अप्पी आपल्याला गुन्हेगाराला पकडायचं आहे पण ते स्वत:च्या जीवाची काळली घेऊन. तसेच पुढे ती अर्जुनला असं म्हणते की, “तुझ्यावरची जबाबदारी आता वाढली आहे”. यावर अर्जुन तिला “एक पोलिस अधिकारी म्हणून ना?” असं प्रश्न विचारतो., यावर अप्पीही उत्तर देत “एक बाप म्हणूनसुद्धा” असं म्हणते.

आणखी वाचा – ‘रियासी’ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी बॉलिवूड कलाकार गप्प, ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्रीने व्यक्त केला राग, म्हणाली…

त्यामुळे आता एकीकडे अमोल त्याच्या आई-बाबांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अप्पीही अर्जुनला त्याच्या बाबा असण्याची सारखी जाणीव करून देत आहे. त्यामुळे आता अप्पी-अर्जुन हे दोघे एकत्र येणार का? अमोल या दोघांना एकत्र आणू शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.   

Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Smita Shewale Exit From Serial

स्मिता शेवाळेने 'मुरांबा' मालिका का सोडली?, एक्झिटबाबत सांगितलं खरं कारण, म्हणाली, "आपल्याला परिस्थीतीनुसार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.