बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर घटस्फोटाबाबत अप्पी-अर्जुन समोरासमोर बोलले, दोघांमध्ये मोठा गैरसमज, कायमचे वेगळे होणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 27, 2024 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector Promo

अखेर घटस्फोटाबाबत अप्पी-अर्जुन समोरासमोर बोलले, दोघांमध्ये मोठा गैरसमज, कायमचे वेगळे होणार

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत अचानक सात वर्षांचा लीप घेतल्याने मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान तब्बल सात वर्षांनी मालिकेत अर्जुन व अप्पी समोरासमोर आलेले पाहायला मिळत आहेत. तर त्यांचा मुलगा अमोलबाबत अद्याप अर्जुनला माहित नसतं. त्यामुळे अर्जुन व अमोलची भेट मालिकेत पाहायला सगळेच उत्सुक आहेत. (Appi Amchi Collector Promo)

अशातच मालिकेत अर्जुनची वहिनी अप्पी या घरात पुन्हा येऊ नये म्हणून कट रचते. ती अप्पीला घटस्फोटाचे पेपर्स पाठवते आणि अर्जुनने हे पेपर्स पाठवले असल्याचा खोटा आव आणते. ते पेपर्स पाहून अप्पीचा खूप मोठा गैरसमज होतो. यादरम्यान अर्जुनच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येतं. अप्पीला जेव्हा हे कळत तेव्हा अप्पी तिच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये विचारपूस करायला येते.

आणखी वाचा – “मला लाथ मारली आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये महिलेकडून वाईट वागणूक, म्हणाली, “मराठी भाषा वापरली तर…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यावेळी रुपाली दोघांनाही अडवते. तेव्हा अप्पीचे बाबा सांगतात, आपण यावर बोलूया. पण रुपाली दोघांनाही निघून जाण्यास सांगते. तेव्हा अप्पी, तिच्या बाबांना आपण आता इथून जाऊया असं सांगते. त्या आता ऐकायच्या मनस्थितीत नाहीत असंही सांगते. त्यानंतर रुपाली अर्जुन व आर्याच लग्न होणार असल्याचं सांगते. आणि तुम्ही दोघे घटस्फोट घेत आहात याची आठवण करून देते. त्यानंतर अप्पी व तिचे बाबा निघून जात असतात. तितक्यात तिथे अर्जुन व आर्या येतात.

आणखी वाचा – “डोंबाऱ्याचा खेळ करत करत…”, मिलिंद गवळींची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाले, “३४ वर्षाचा प्रवास…”

अर्जुन आर्या व अर्पणाची एकमेकांना ओळख करून देते. त्यानंतर अपर्णा अर्जुनला सांगते की, बाबांची इच्छा असेल तर तू लग्न कर, मी घटस्फोटाच्या कागदावर सही करते असं सांगते. यावर अर्जुन, हो आता मागचं सगळं सोडून द्यायचं ठरवलं असल्याचं सांगतो. त्यानंतर अप्पी व तिचे बाबा निघून जातात. दोघेही जड अंतःकरणाने हे बोलत असतात हे प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे. आता मालिकेत नेमका कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: Appi Amachi Collector PromoAppi Amchi Collectorentertainmentmarathi serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Hollywood actor Johnny Vector shot dead in robbery see the details

धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्याची रस्त्यावरच गोळ्या झाडून हत्या, चोरी करण्याच्या हेतूने घेरलं अन्…; नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.