Appi Amchi Collector Arjun : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरु असून या मालिकेने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेला प्रेक्षकांच्या भरभरुन पाठिंबा मिळालेला पाहायला मिळाला. या मालिकेने सात वर्षांचा लीप घेतला आणि मालिका एकदम यशाच्या शिखरावर गेली. या मालिकेतून अर्जुन या पात्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ही भूमिका अभिनेता रोहित परशुराम याने साकारली होती. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.
अप्पी आमची कलेक्टर मालिकेमुळे रोहितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अप्पी-अर्जुन आणि सिम्बा ही पात्र या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. आता मात्र गोड शेवट घेत ही मालिका साऱ्यांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अर्जुनने म्हणजेच रोहितने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत अपडेट शेअर केली आहे आणि त्याच्या पात्रासह मालिकेच्या शूटिंगच्या आठवणीही शेअर केल्या आहेत.
आणखी वाचा – दोन घटस्फोटांनंतर आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात, कोण आहे ‘ती’ मुलगी?, फोटो व्हायरल
रोहितने मालिकेच्या आठवणी फोटोस्वरूपात शेअर करत खास कॅप्शन या फोटोला दिलं आहे. “पावणेतीन वर्ष. ८५० भाग आणि २००० पेक्षा जास्त सीन. असंख्य भावना, अगणित चांगल्या वाईट आठवणी. एक आसगाव आणि एक अर्जुन वर्षा विनायक कदम हा प्रवास थांबला. एकदा संपलं की संपलं. ते परत नाही येत”, असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनीही यावर कमेंट केल्या आहेत आणि मालिकेला आणि अर्जुनला मिस करणार असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – “जिहादी, दहशतवादी…”, पती, मुलाला ट्रोल करताच सना खान भडकली, म्हणाली, “लाज वाटते का?”
“आसगाव आणि अर्जुन वर्षा विनायक कदम खूप भारी समीकरण आहे. आसगावचे सर्वच एपिसोड छान होते. तुम्ही सर्व कलाकारांनी खूप छान काम केले म्हणून मालिकेने ८५० भाग पूर्ण केले. भेटू पुन्हा एकदा नवीन वाटेवर”, “प्रेक्षकांचे प्रेम हेच तुमच्या कामाची पोचपावती”, “अप्पी-अर्जुनला खूप मिस करू”, अशा असंख्य कमेंट या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. आणि अर्जुनला म्हणजेच रोहितला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.