‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सात वर्षांचा लीप आलेला पाहायला मिळत आहेत. तेव्हापासून मालिका रंजक झाली आहे. अप्पी व अर्जुन यांचा मालिकेत सात वर्षांचा दुरावा दूर होताना लवकरच पाहायला मिळणार आहे. मालिकेत अप्पी व अर्जुनची भेट झालेली असते. मात्र अमोलबद्दल अप्पी अर्जुनला काहीच सांगत नाही. अर्जुनला सात वर्षांपूर्वी अप्पीने वचन दिलेलं असतं. ते वचन अप्पी पाळत असते. तर इकडे अर्जुन समर कॅम्प घेतो तिथे त्याची अमोलबरोबर ओळख होते. अमोलची ओळख समर कॅम्पमध्ये सिम्बा अशी असल्याने अर्जुन त्याला ओळखत नाही. (Appi Amachi Collector Promo)
अप्पी अमोलला चपाती आणि मेथीची भाजी बनवून देते. अमोल टिफिन घेऊन समर कॅम्पला जातो. तेव्हा मधल्या सुट्टीमध्ये अमोलला चपाती भाजी खाऊन बोर झालेलं असतं त्यामुळे आईने दिलेला टिफिन त्याला खायचा नसतो. तितक्यात समोर अर्जुन बसलेला असतो आणि तितक्यात अर्जुनचं पार्सल येतं. अर्जुनने टिफिन आणलेला नसतो म्हणून अर्जुन बाहेरुन पार्सल मागवतो. आणि ते अमोल पाहतो. तेव्हा अमोल डब्बा न खाण्यासाठी शक्कल लढवतो आणि टिफिन घेऊन अर्जुनकडे जातो.
अर्जुनला जाऊन अमोल बोलतो, मास्तर हे बघा मी तुमच्यासाठी डब्बा आणला आहे. हे ऐकून अर्जुन त्याला विचारतो, तुझा डब्बा मी खाल्ला तर तू काय खाणार?, यावर अमोल अर्जुनने मागवलेल्या पार्सलकडे पाहतो आणि सांगतो की, मी चायनीस खाणार. त्यानंतर दोघेही खाली डब्बा खायला बसतात. तेव्हा अर्जुन अमोलच्या डब्यातील चपाती-भाजीचा एक घास खातो, तेव्हा अमोल म्हणतो, माझी माँ बेस्ट जेवण बनवते. यावर अर्जुन सात वर्ष मागे गेलो एकदम असं मनात बोलताना दिसतो.
सात वर्षांनी अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव अर्जुन ओळखू शकणार का?, अर्जुनला अमोल त्याचा मुलगा असल्याचं सत्य समजणार का?, अमोलसाठी अर्जुन व अप्पी एकत्र येणार का?, हे सर्व मालिकेत पाहणं रंजक ठरेल.