झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत अधिपतीची गायन शिकवणी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. तर एकीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला गाणं शिकवायला सरगम मॅडमला बोलावलं असून तिला अधिपतीच्या आयुष्यात स्थान मिळवण्यास सांगितलं आहे आणि त्यासाठी भुवनेश्वरी तिला काही पैसेदेखील देते. भुवनेश्वरीला अक्षराला अधिपतीच्या आयुष्यातून काढून टाकायचं असल्यामुळे ती हा नवा डाव आखते.
मालिकेच्या कथानकात नुकतीच त्यांच्या घरात पूजा होतानाचे पाहायला मिळाले. यावेळी पूजेच्या दरम्यान सरगम मॅडम पूजाच्या विधीवेळी सारखी अधिपतीला हात लावतानाचे पाहायला मिळाले आणि हीच गोष्ट अक्षराला खटकत आहे. दरम्यान पूजा झाल्यानंतर अधिपती-अक्षरा खोलीत जातात. त्यावेळी अक्षरा अधिपतीला तिच्या एका मैत्रिणीचे उदाहरण देत सरगमविषयी बोलातानाचे दाखवण्यात आले आहे. याचाच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडीओमध्ये अक्षरा अधिपतीला फोनवर तिच्या एक मैत्रिणीचे उदाहरण देत असं म्हणते की, “माझ्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याने कुणाशी बोललेलं नाही आवडत. तिला याचा त्रास होतो. मग आपल्याला का त्रास होतोय याचाही त्रास होतो. आणि ती प्रयत्न करते स्वत:ला शांत करण्याचा. पण मग तिच्याससमोर पुन्हा काहीतरी घडतं आणि तो सगळा त्रास पुन्हा सुरु होतो. सगळं अवघड होतं.”
यावर अधिपती अक्षराला उत्तर देत असं म्हणतो की, “खूपच विचित्र प्रकरण आहे तुमच्या मैत्रिणीचं. पण आता ऊंटांवरून शेळ्या हाकल्यासारखं होणार आहे. आपल्याला काहीच माहिती नाही आणि तिला तिच्या नवऱ्यावर संशय आहे, तो नवरा खरा आहे की नाही याबद्दल आपल्याला माहिती नाही. पण जर तिचा नवरा माझ्यासारखा असेल तर तिने १ टक्का पण संशय नाही घेतला पाहिजे.”
आणखी वाचा – लेकाला शाळेतच न पाठवणारी आई, १३ वर्षांचा मुलगा शाळेत न जाता कसं घेतो शिक्षण?, थक्क करणारा संपूर्ण प्रवास
दरम्यान, अक्षरा-अधिपती यांच्यातील हे संभाषण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत असून मालिकेचे हे कथानकही त्यांना चांगलेच आवडत आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय पाहायला मिळणार? भुवनेश्वरीच्या इच्छेप्रमाणे अधिपती-अक्षरा वेगळे होणार का? की त्यांचे प्रेम यावर मात करणार? हे आगामी भागांमध्ये पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.