शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन कायमचा दूर जाणार असल्याची अप्पीला भीती, साखरपुडा झाल्यानंतर सगळ्या अपेक्षाच सोडल्या, पुन्हा प्रेम मिळवण्यासाठी धडपड

Saurabh Moreby Saurabh More
जून 7, 2024 | 5:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector Appi's hope for Arjun seems come to an end new video on social media

अर्जुन कायमचा दूर जाणार असल्याची अप्पीला भीती, साखरपुडा झाल्यानंतर सगळ्या अपेक्षाच सोडल्या, पुन्हा प्रेम मिळवण्यासाठी धडपड

छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अप्पी व अर्जुन हे सात वर्षांनी आता पुन्हा एकदा एकत्र येत असल्याचं चित्र दिसत आहे. काही कारणांनी हे दोघे वेगळे  झाले होते मात्र आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सिंबामुळे हे अप्पी व अर्जुन एकत्र आले आहेत.

अप्पी अमोलपासून अर्जुनच त्याचा बाबा असल्याचे लपून ठेवते. मात्र अर्जुनच  बाबा असल्याचे सत्य आता अमोलला समजलं आहे. शिवाय बाबांच्या घरच्यांची आणि त्याच्या माँची भांडणं झाली असल्याचेही अमोलसमोर आलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही घरांना एकत्र आणण्यासाठी अमोल स्वतः कष्ट घेताना दिसत आहे. मालिकेत नुकताच अर्जुन व आर्याचा साखरपुडा झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे आता अप्पीने अर्जुनविषयीच्या सर्व आशा सोडून दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

याचबद्दलचा एक व्हिडीओ झी मराठीच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या बापूंकडे अर्जुनविषयीच्या भावना व्यक्त करते. यावेळी ती बापूना असं म्हणते की, “अप्पी अर्जुनचं आणि माझं नातं म्हणजे पाऊस आणि वाळवंटासारखं झालं आहे. सगळंच विरुद्ध दिशेला. मी आस लावून बसले आज पाऊस पडेल, आज पाऊस पडेल. पण असं काहीच होत नाहीये.”

आणखी वाचा – आदित्यला दुखापत झाल्यानंतर पारूने रडत सांगितली तिच्या मनातली गोष्ट, अहिल्यादेवींना दामिनी दोघांविषयी भडकवणार, पुढचा निर्णय काय?

यापुढे अप्पी अर्जुनकडून आता कसलीच आशा उरली नसल्याचेही म्हणते. यावेळी “आता अर्जुन आणि मी कधीच एकत्र येऊ शकत नाही. अर्जुनने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. बापू त्याचा साखरपुडा झाला आहे”. असं म्हणते.

आणखी वाचा – Video : बाबा झाल्यानंतर लेकीला पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर घेऊन आला वरुण धवन, रुग्णालयामधून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अमोलसह सर्वांना अप्पी-अर्जुन यांनी मागचं सगळं विसरून पुन्हा  एकदा एकत्र यावी अशी इच्छा आहे. मात्र आता एकीकडे अर्जुन व आर्या यांचा साखरपुडा झाला आहे तर दुसरीकडे अप्पीलादेखील त्याच्याविषयीची अपेक्षा आता संपत चालली आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र येणार का? अमोल या दोघांना एकत्र आणू शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.a    

Tags: appi aamchi collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
Next Post
karan kundra relationship

करण कुंद्रा १८ वर्षांनी लहान मुलीला करत आहे डेट?, तेजस्वी प्रकाशबरोबर ब्रेकअप अन्…; नक्की दोघांच्या नात्यामध्ये येणारी 'ती' कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.