शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुरस्कार स्वीकारताना अंकुश चौधरीला अतुल परचुरेंची आठवण, पाणावले डोळे, म्हणाला, “त्याची खूप आठवण येतेय कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 19, 2024 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankush Chaudhari getting emotional while accepting the award on the death of late actor Atul Parchure video viral on social media.

दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांच्या आठवणीत अंकुश चौधरी भावुक, पुरस्कार स्वीकारताना पाणावले डोळे

नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी. अंकुशला मराठी कलाविश्वातील स्टाइल आयकॉन म्हणून ओळखलं जातं. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘दुनियादारी’, ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरु’, ‘ट्रिपल सीट’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करत अंकुशने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील भूमिकेचे अनेक कौतुक झाले. यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. अशातच त्याला या भूमिकेसाठी आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. (Ankush Chaudhari Emotional)

अंकुशला नुकताच ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील शाहीर साबळेंच्या भूमिकेसाठी ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ हा पुरस्कार मिळाला असून या पुरस्कार सोहळ्याच्या खास क्षणांचा व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना अंकुशला आनंद झाला. मात्र यावेळी तो अतुल परचुरे यांच्या आठवणीत भावुकही झाला. हा पुरस्कार स्वीकरताना अंकुश असं म्हणाला की, “आज सगळ्यात जास्त मला आठवण येत आहे ती म्हणजे अतुल परचुरेची. त्याला मी खूप मिस करत आहे. आज तो आपल्यात नाही. मला कोणताही पुरस्कार मिळाला तरी मला त्याचा फोन येतो. अतुल हा पुरस्कार तुझ्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

आणखी वाचा – ६० सुरक्षा कर्मचारी, पोलिस बंदोबस्त अन्…; धमकी मिळाल्यानंतर सलमान खानसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर कडक नियम, जीव धोक्यात तरीही…

अतुल परचुरे यांचं १५ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या एक्झिटमुळे सिनेविश्व आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. त्यांच्या अत्यंदर्शनालाही संपूर्ण कलासृष्टी हजर होती. यावेळी अनेक कलाकारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. अतुल यांच्या जाण्यानं मनोरंजन सृष्टीत पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर फक्त सिनेविश्वातीलच नाही तर, अनेक राजकीय मंडळींनीदेखील दुःख व्यक्त केलं. अशातच अंकुशनेही पुरस्कार सोहळ्यात अतुल यांच्या निधनावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Video : रितेश देशमुखने घरीच मुलांसाठी तयार केले पार्टीचे कपडे, टीशर्टवर फुटबॉलचं चित्र रंगवलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अंकुशच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येणार आहे. ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट १७ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अशातच याचा दूसरा भाग येणार आहे. याचा मुहूर्त पार पडला असून चित्रपटाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. यात मकरंद अनासपुरे, भरत जाधव, अशोक सराफ यांच्यासह अभिनेता संकेत पाठक आणि रिंकु राजगुरुही आहेत.  

Tags: Ankush Chaudhari EmotionalAnkush Chaudhari Emotional For Atul ParchureAnkush Chaudhari Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss 18 Content creator Hema Sharma aka Viral Bhabhi eliminated from the total of 10 nominees

Bigg Boss 18 : दुसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’मधून ‘हा’ सदस्य घराबाहेर?, सलमान खान चांगलीच शाळा घेणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.