प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये दिसत आहे. या शोपूर्वी अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिच्याबरोबर तिचा पती विकी जैनही सहभागी झाला होता. या शोमध्ये दोघांमध्ये जोरदार भांडण, वादावादी झालेली पाहायला मिळाली. त्यांच्या नात्यातील अनेक चढ-उतार पाहून विकीच्या आईनेही शोमध्ये येऊन अंकिताला समजावले होते. या शोनंतर चाहत्यांना असे वाटू लागले की, कदाचित त्यांचे नाते आता टिकणार नाही, परंतु तसे झाले नाही आणि कालांतराने त्यांचे नाते आणखी घट्ट झाले. ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लोकांची मने जिंकली.
अंकिता-विकी ‘बिग बॉस’मध्ये अनेकदा भांडताना दिसले, मात्र आता या शोमध्ये त्यांचा नवा चेहरा पाहायला मिळाला. दोघे मस्ती करताना आणि लोकांना खूप हसवताना दिसत आहेत. अशातच अंकिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमधून तिच्या प्रेग्नन्सीबद्दलचा खुलासा झाला आहे. नुकताच शोमधील अंकिताचा सहकलाकार अली गोनीने अंकिताच्या प्रेग्नेंसीकडे इशारा केला होता, ज्यानंतर अभिनेत्रीला थोडा राग आला. अंकिता लोखंडेच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अली गोनी अंकिताची मस्करी करताना दिसत आहे. अंकिता सेटवर एक-एक करुन सगळ्यांना मिठी मारते. जेव्हा ती अलीच्या समोर येते तेव्हा तो गमतीने विचारताना “प्रेग्नंट आहे का?” असं विचाऱतो.
आणखी वाचा – शेवटी बापच तो! लेकींना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही पॅडी, एकमेकांना घट्ट मिठी मारली तेव्हा…
अली गोनीच्या मस्करीवर अंकिता आधी हसली आणि नंतर चिडून म्हणाली की, “वेडा झाला आहेस का?”. संपूर्ण टीम आणि कॅमेऱ्यासमोर अलीचे बोलणे ऐकून तिला आनंद झाला नसल्याचे तिच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट दिसत आहे. तशा अनेक कमेंट्सही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत. याबद्दल एकाने असं म्हटलं आहे की, “अली हा डॉक्टर किंवा हकीम आहे का? जो तिच्या पोटाला हात लावून ती प्रेग्नंट आहे का? हे विचारत आहे”. पुढे एकाने असं म्हटलं आहे की, “जर तुम्ही खरोखरच प्रेग्नंट असाल मॅडम, तर तुमचे अभिनंदन”. तसंच एकाने “तुम्ही गर्भधारणेची किती वेळा चेष्टा कराल?” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “अंकिता प्रत्येक शोमध्ये प्रेग्नंट होते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. लग्नाआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. २०१९मध्ये अंकिताने विकीबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. त्यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली असून आता या व्हिडिओच्या आधारे अंकिता आई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बातमीमुळे तिचे अनेक चाहते खुश आहेत.