मराठी मालिकांच्या विश्वात अनेक वाहिन्या वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त असतात. या मालिकांच्या शर्यतीत एक मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात ती म्हणजे झी मराठी वाहिनी वरील ‘नवा गडी नवं राज्य’. दुसऱ्या लग्नानंतर आयुष्यात येणारे बदल आणि त्या बदलात सोबत असणारी व्यक्ती या घटनेवर आधारित ही मालिका प्रेक्षकांना आपलंस करते.(Anita Date)
मालिकेतील आनंदी हे पात्र अभिनेत्री पल्लवी पाटील आणि मालिकेतील मुख्य पात्र राघव कर्णिक हे अभिनेता कश्यप परुळेकर साकारताना दिसतोय. तसेच या मालिकेत राघवच्या पहिल्या पत्नीची भूमिका अभिनेत्री अनिता दाते साकारत आहे. अनिताने साकारलेल्या या पात्राचं नाव रमा असं आहे तर रामा आणि राघवच्या मुलीची भूमिका बालकलाकार साईशा भोईरने साकारली आहे.

नक्की काय आहे प्रोमोत?
आतापर्यंतच्या कथानकात रामा गेल्या नंतर राघव रमाच्या मुलींसाठी आई म्हणून आनंदीला कर्णिक घरात आणण्यात आलं. तरीही रमा आनंदीच्या आणि राघवच्या संबंधात काही ना काही बाधा आणताना प्रेक्षकांना दिसत होती.आनंदी आणि राघवची जोडी हि प्रेक्षकांना चांगलीच आवडत असताना रमाचा खोडकर अंदाज हि प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. परंतु आता रमाची मालिकेतून एक्झिट होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. झी मराठीच्या ऑफिशियल फेसबुक अकाउंट वरून एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये आनंदी आणि रमा या दोघींचं संभाषण दाखवण्यात आलं आहे. या प्रोमो मध्ये रमा ‘माझा प्रवास इथेच संपला इथून पुढे काय असेल मला माहिती नाही असं म्हणताना दिसते. तर संभाषणा दरम्यान दोघेही भावुक झाल्याचं दिसतात.

तर मालिकेतील रमाचं म्हणजेच अभिनेत्री अनिता दातेच मालिकेतील पात्र इथेच प्रेक्षकांचा निरोप घेणार का या गोष्टीकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. तर नवा गडी नव राज्य या मालिकेतून निरोप घेऊन अनिता कोणत्या नवीन मालिकेमध्ये, नाटकामध्ये कि चित्रपटामध्ये दिसणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
====
हे देखील वाचा – आई जिजाऊंचा जयघोष करत ऑस्ट्रेलीयात स्नेहल तरडेचं कौतुक करण्यासारखं धाडस
====
प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्यात चालत आलेल्या या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा भाग होऊन बसतात. मालिकांमधील पात्रांशी स्वतःला कुठेतरी तोलून त्या पात्रांसारखं जगण्याचा प्रयत्न प्रेक्षक करत असतो त्यामुळे तो विषय अगदी जवळचा वाटण हे कोणत्याही प्रेक्षकांसाठी साहजिक आहे. त्यामुळे आवडत्या पात्राचा मालिकेतील निरोपही प्रेक्षकांसाठी नाराजीचं कारण ठरू शकतो. अनिताने या आधी झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.