अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर अनेक कलाकार हे त्यांच्या एखाद्या विशिष्ट कामामुळे चांगलेच चर्चेत येतात. प्रसिद्धीच्या वाटेवर अशीच अग्रेसर झालेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. पवित्र रिश्ता या मालिकेतून अंकिता घराघरात पोहचली. पुढे अनेक कारणांमुळे ती चर्चेत ही राहिली. ५ वर्षांपूर्वी तिने बिझनेसमन विकास जैन सोबत लग्न केले. त्याची जोडी ही तेव्हा पासून चांगलीच चर्चेत आहे.(Ankita Lokhande Vikas Anniversary)
नुकतंच त्यांच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त सेलिब्रेशन करतानाच व्हिडिओ अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केला आहे. अंकिता आणि विकास या व्हिडिओ मध्ये कॅण्डल्स नि सजलेला केक कट करत सुंदर सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये अंकिताने ‘या सुंदर माणसाला पाच वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल धन्यवाद ज्याचे हृदय सुंदर आहे आणि त्याला फक्त प्रेम देणे आणि इतरांचा आदर करणे माहित आहे’ असं म्हणत विकासच कौतुक करत आभार देखील मानले आहेत.

अंकिताने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात अंकिता झळकली होती. डिसेंबर २०२१मध्ये अंकिताने व्यावसायिक विकी जैनसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.(Ankita Lokhande Vikas Anniversary)