सध्या भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची लगबग सुरु असलेली दिसत आहे. संपूर्ण सोशल मीडियावर अनंत व राधिका यांच्या लग्नाचे समारंभाचे फोटो व व्हिडीओ दिसून येत आहेत. सर्व समारंभातील राधिकाच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे नीता अंबानी यांच्या लूकचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. राधिकाचे आतापर्यंतचे सर्व कपडे मनीष मल्होत्राने केले असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता अंबानी कुटुंबाची राजकुमारी ईशा अंबानीच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे. (isha ambani look)
अंबानी कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून घरातील प्रत्येक सदस्याचे वेगवेगळे लूक समोर आले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची चेअरमन व MD मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. १० जुलै रोजी गृह शांती पूजेच्या वेळी ईशाने परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ईशाची स्टायलिस्ट अनाइता श्रॉफ अदजानियाने तिचा लूक तयार केला आहे. हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
तिने कॉपर रंगाचा लेहंगा परिधान केला असून त्यावर खूप बारकाईने काम करण्यात आले आहे. हाताने नक्षीकाम केले असून त्यावर सोनेरी, मातकट व लाल रंगाने जटिल काम केले आहे. या लूकमुळे राजेशाही थाट दिसून येत आहे. लेहंग्याच्या बॉर्डरवर जरदोजी कढाई व क्रिस्टल वर्क दिसून येत आहे. तसेच त्यावर गाय व पक्षांचीही डिझाईन असलेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे यावर संस्कृतमधून श्लोकदेखील प्रिंट केले आहेत. तसेच त्यावर शिमरी हिल्सही दिसून येत आहेत.
याबरोबर तिने सोन्याचा कडा व बांगड्या घातल्या आहेत. तसेच मोठ्या सोन्याच्या अंगठ्याही घातल्या आहेत. मोठे कानातले तसेच मोठ्या डिझाईनचा नेकलेस तिच्या सौंदर्यामध्ये अजून भर घालत आहे.