मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. त्यांच्या लग्नाआधी दोघांच्याही प्री-वेडिंगचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. हे वर्ष सुरु झाल्यानंतर सुरुवातीलाच अंबानी कुटुंबाने गुजरात येथील जामनगर येथे पहिल्यांदा हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यानंतर एका अलिशान क्रुजवरही दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. (radhika and anant ambani wedding party)
अनंत व राधिका यांचा १२ जुलै रोजी मुंबई येथे शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक प्रमाणात पाहायला मिळाले. अनंत व राधिका यांच्या सर्व फोटो व व्हिडीओना मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळाली होती. पाच दिवस मुंबईमध्ये जल्लोषात लग्न पार पडल्यानंतर आता अंबानी कुटुंब लंडनमध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झाला असून त्याबद्दलची माहिती समोर आली आहे.
अनंत व राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम संपायचे नाव घेत नाहीत. यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी लंडनमध्ये एक अलिशान 7 स्टार स्टोक पार्क हॉटेल बुक केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड, हॉलिवूडसहित इतर क्षेत्रातील दीग्गज पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे ब्रिटन येथील शाही कुटुंबालादेखील आमंत्रीक करण्याची शक्यता आहे.
अंबानी कुटुंबाने जया ठिकाणी पार्टीचे आयोजन केले आहे. ती जागा रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२१ सलाई ५७ मिलियन पाउंड किंमतीला ही मालमत्ता भाडेतत्वावर घेतली होती. त्यांनतर ३०० एकर जागेच्या नूतणीकरणालाही सुरुवात झाली होती. लंडनच्या बाहेर असणाऱ्या या मालमत्तेमध्ये एक मोठी हवेली, गोल्फ कोर्स व टेनिस कोर्ट आहे. स्टोक पार्क हॉटेल सामान्य जनतेसाठी बंद आहे मात्र अंबानी कुटुंबासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे.