शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचं पुन्हा जोरदार सेलिब्रेशन, लंडनमध्ये दोन महिन्यांसाठी अलिशान हॉटेलंही केलं बुक

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 25, 2024 | 7:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
radhika and anant ambani wedding party

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचं पुन्हा जोरदार सेलिब्रेशन, लंडनमध्ये दोन महिन्यांसाठी अलिशान हॉटेलंही केलं बुक

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. त्यांच्या लग्नाआधी दोघांच्याही प्री-वेडिंगचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. हे वर्ष सुरु झाल्यानंतर सुरुवातीलाच अंबानी कुटुंबाने गुजरात येथील जामनगर येथे पहिल्यांदा हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यानंतर एका अलिशान क्रुजवरही दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. (radhika and anant ambani wedding party)

अनंत व राधिका यांचा १२ जुलै रोजी मुंबई येथे शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक प्रमाणात पाहायला मिळाले. अनंत व राधिका यांच्या सर्व फोटो व व्हिडीओना मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळाली होती. पाच दिवस मुंबईमध्ये जल्लोषात लग्न पार पडल्यानंतर आता अंबानी कुटुंब लंडनमध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झाला असून त्याबद्दलची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – “तुझं भारीपण लक्षात यायला उशीर झाला”, छाया कदम यांच्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “अभिनयाच्या यशाबरोबरच…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत व राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम संपायचे नाव घेत नाहीत. यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी लंडनमध्ये एक अलिशान 7 स्टार स्टोक पार्क हॉटेल बुक केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड, हॉलिवूडसहित इतर क्षेत्रातील दीग्गज पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहेत. त्याचप्रमाणे ब्रिटन येथील शाही कुटुंबालादेखील आमंत्रीक करण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा – टीव्ही इंडस्ट्रीतून अभिनेत्रीला काम मिळणं बंद झालं आणि…; सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सोडवतेय नागरिकांचे प्रश्न, करत आहे ‘हे’ काम

अंबानी कुटुंबाने जया ठिकाणी पार्टीचे आयोजन केले आहे. ती जागा रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२१ सलाई ५७ मिलियन पाउंड किंमतीला ही मालमत्ता भाडेतत्वावर घेतली होती. त्यांनतर ३०० एकर जागेच्या नूतणीकरणालाही सुरुवात झाली होती. लंडनच्या बाहेर असणाऱ्या या मालमत्तेमध्ये एक मोठी हवेली, गोल्फ कोर्स व टेनिस कोर्ट आहे.  स्टोक पार्क हॉटेल सामान्य जनतेसाठी बंद आहे मात्र अंबानी कुटुंबासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे.  

Tags: anant ambanipartyradhika merchantwedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Next Post
26 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, मिथुन व मीन राशीच्या लोकांसाठी शुक्रवार फलदायी, मनातील इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.