चित्रपटाच्या कथेसारखंच चित्रपटाचं नाव सुद्धा हटकेच असावं आणि हटके नाव म्हणजे एकचं नाव मराठी चित्रपटसृष्टीत अगदी हक्काने घेतलं जाऊ शकत ते म्हणजे अभिनेते, दिगदर्शक, लेखक, निर्माते नागराज मंजुळे म्हणजेच इंडस्ट्रीतील सगळ्यांचे लाडके नागराज आण्णा.(sayaji shindi dance)
अतिशय सर्वसामान्य घरातून आलेले नागराज मंजुळे यांनी त्यांच्या कल्पना शक्ती आणि जिद्दीने स्वतःला एक उत्तम लेखक तसेच दिग्दर्शक म्हणून सिद्ध केले आहे. या वर्षी नागराज यांचा “घर बंदूक बिर्याणी” नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटातील गाण्याचा टिझर नुकताच लॉन्च झाला आहे. या संबंधीचा व्हिडियो नागराज मंजुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. या गाण्याची कोरियोग्राफी प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी केलीये आणि या गाण्यात त्यांच्यासोबत सयाजी शिंदे आणि इतर कलाकार ताल धरताना दिसत आहेत.
असं झालं गाण्याचं दिगदर्शन(sayaji shindi dance)
“आहा हेरो” असे या गाण्याचे नाव असून नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य हे सुद्धा सयाजी शिंदे आणि इतर कलाकारानंसोबत या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सयाजी शिंदे यांना आपण आतापर्यंत गंभीर आणि विनोदी भूमिका करताना आपण पाहिलं आहे. पण सयाजी शिंदे यांना नाचताना खूप कमी वेळा बघितलं जातं आता गणेश आचार्य त्यांना त्यांच्या तालावर कसं नाचवतायत हे पाहणं फार मजेशीर असेल. याआधी गणेश आचार्य यांनी अनेक मराठी सिनेमात नृत्य दिग्दर्शन केलं आहे. या व्हिडियोवर अनेक चाहत्यांनी छान कमेंट ही केल्या आहेत आणि या गाण्याची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत.(sayaji shindi dance)
====
हे देखील वाचा- ये शादी करना COMPULSORY है क्या? प्राजक्ता माळीचा थेट शंकर गुरुदेव यांना प्रश्न, गुरुदेवांच हटके उत्तर
====
मास कम्युनिकेशनच्या प्रोजेक्टचा भाग म्हणून नागराज यांनी “पिस्तुल्या” सारखा लघुपट तयार केला. या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालंय. यानंतर नागराज यांनी मागे वळून न पाहता. फॅड्री आणि सैराट सारखे हिट सिनेमे दिले. या दोन्ही सिनेमांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नागराज यांनी हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाच्या साथीने “झुंड” सारख्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले आहे. आता नागराज यांचा “घर बंदूक बिर्याणी” हा सिनेमा प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेलं.