शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलाला शाळेतच न पाठवणारी आई, नेमकं कसं सुरु आहे लेकाचे शिक्षण?, जाणून घ्या रंजक प्रवास…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 25, 2024 | 6:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Amruta Joshi Amdekar who completed her son education through homeschooling without sending her to school

मुलाला शाळेत न पाठवता होमस्कुलिंगद्वारे शिक्षण पूर्ण करणाऱ्या अमृता जोशी आमडेकर यांच्याबद्दल जाणून घ्या...

आजच्या या स्पर्धात्मक युगात आपला मुलगा-मुलगी कायमच सर्वांपेक्षा पुढे असावेत, ते कायमच सर्व क्षेत्रात अग्रेसर असावेत असा प्रत्येक आई-वडिलांचा अट्टहास असतो आणि त्यामुळे प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी मेहनत घेताना दिसतात. मात्र एक अशीही आई आहे जिने आपल्या मुलाला कधी शाळेतच पाठवलं नाही. ही आई स्वतः उच्चशिक्षित आहे, मात्र आपल्या लेकराला तिने आजवर शाळेत पाठवलच नाही आणि ही आई म्हणजे अमृता जोशी आमडेकर. ‘मज्जा पिंक’ला दिलेल्या खास मुलाखतीत अमृता यांनी त्यांच्या व त्यांच्या मुलाच्या या अद्भुत प्रवासाबद्दल सांगितलं होतं. (Amruta Joshi Amdekar Marathi News)

या प्रवासात अमृता जोशी आमडेकर यांना अनेक टीका व टोमणे सहन करावे लागले. पण लोकांच्या या टीका-टोमण्यांना न जुमानता त्यांनी आपल्या मुलाला योग्य ते आणि परिपूर्ण शिक्षण दिलं आहे. यावेळी अमृता यांनी असं म्हटलेलं की, “त्याने एक-दोन वर्षे शाळा अनुभवली आहे. आधी तो इंटरनॅशनल शाळेत होता व नंतर त्याने आय.सी.एस.सी. बोर्डाची शाळा अनुभवली आहे. यादरम्यान त्याला आम्ही Homeschooling करत होतो. मात्र एके दिवशी त्याने येऊन सांगितलं की, त्या शाळेपेक्षा आपली Homeschooling जास्त आवडते”.

यापुढे अमृता यांनी असं म्हटलेलं की, “लग्नाच्या आधी मी माझे शिक्षण घेत असताना एके ठिकाणी वाचलं होतं की, अमेरिकेत एका आई-वडिलांनी त्यांच्या मुलाला शाळेत न् पाठवताच Homeschooling द्वारे शिक्षण दिले. त्यामुळे मीही माझ्या मुलाला शाळेत न पाठवता माझ्या मुलाला Homeschooling चं शिक्षण देणार असं ठरवलं होतं. मात्र लग्नानंतर मी जे ठरवलं होतं ते सगळं विसरून गेले आणि मीसुद्धा त्याला शिक्षण देण्याच्या शर्यतीत लागले. पण या सगळ्यात शिक्षण मिळत नव्हतं असं मला वाटलं आणि मग त्याला Homeschooling देण्याचा माझा प्रवास सुरु झाला”.

यापुढे अमृता यांनी Homeschooling ची संकल्पना समजावून सांगताना असं म्हटलं की, “Homeschooling म्हणजे सानुकूलित शिक्षण (customized education). आपल्याला सगळ्या गोष्टी customized म्हणजेच आपल्या सोयीनुसार मिळत आहेत. त्याच उद्देशाने ही Homeschooling ची पद्धत सुरु झाली. पण मग शिक्षण व्यवस्थेचा भाग होण्यासाठी दहावी, बारावीची परीक्षादेखील देता येते. Homeschooling मध्ये इतर शिक्षणासह या शिक्षणपद्धतीचा अभ्यासही चालूच असतो.”

Tags: Amruta Joshi AmdekarAmruta Joshi Amdekar Marathi NewsAmruta Joshi Amdekar News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
malaika arora on arjun kapoor

अर्जुन कपूरच्या ‘त्या’ वक्तव्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली मलायका अरोरा, म्हणाली, “माझं खासगी आयुष्य सार्वजनिकरित्या…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.