मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच रिअल लाईफ कपलकडे पाहिलं की, त्यांचा हेवा वाटतो. त्यातीलच एक जोडपं म्हणजे प्रसाद जवादे व अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये प्रसाद व अमृतामध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. प्रसादने तर अमृतावर असणारं प्रेम शोमध्येच बोलून दाखवलं. पण ‘बिग बॉस’ पुरताच दोघांचं प्रेम मर्यादित राहिलं नाही. प्रसाद व अमृताच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लवकरच दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. पण त्याचपूर्वी अमृता नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात गेली होती. आता ती पुन्हा भारतात परतली आहे. (amruta deshmukh prasad jawade video)
अमृता तिच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकासाठी महिनाभर परदेश दौऱ्यावर होती. परदेशात जात असताना प्रसादबरोबर तिने एकत्रित वेळ घालवला. दोघंही रोमँटिक डेटवर गेले होते. त्यादरम्यानचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. अमृता भारतात येणार म्हटल्यावर तिला सरप्राइज देण्यासाठी प्रसाद विमानतळावर पोहोचला. त्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा – “हॉटेल सुरु करायचं तुझं स्वप्न होतं पण…” अभिनेत्री माधुरी पवारच्या भावाचं निधन, म्हणाली, “नियतीच्या मनात…”
विमानतळावर जेव्हा अमृताला प्रसादने पाहिलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या चेहऱ्यावरही हास्य लक्ष वेधून घेणारं होतं. प्रसाद पाहून अमृताहीभारावून केली. तिच्या स्वागतासाठी हातात एक हार्ट शेप बलून घेऊन प्रसाद उभा होता. त्यावर वेलकम अमृता असं लिहिलं होतं. प्रसाद व अमृताचा हा व्हिडीओ पाहून दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम दिसून येतं.
आणखी वाचा – नारकर कपलने डान्स केला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, त्यांना हिणवणारे तुम्ही कोण?
विमानतळावरील व्हिडीओ शेअर करत अमृताने म्हटलं की, ”माझे सर्वात सुंदर स्वागत”. तर प्रसादचा फोटोही तिने शेअर केला. “हा प्रेमाचा राग चांगला आहे” असं तिने फोटो शेअर करत म्हटलं. प्रसाद-अमृताच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्याचप्रमाणे कुटुंबियांनी आणि कलाकार मंडीळींनी त्यांचा केळवणाचा कार्यक्रमही उत्साहात साजरा केला. येत्या १८ नोव्हेंबर त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.