‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख व प्रसाद जवादे लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. अमृता व प्रसादने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अगदी संदेहपानाने व कुटुंबियांच्या समवेत त्यांनी हा साखरपुडा सोहळा उरकला. अमृता व प्रसादने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्यांच्या साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही रोमॅंटिक अंदाजात पाहायला मिळाले असून त्यांच्या हातात अंगठी देखील पाहायला मिळाली. (Amruta Deshmukh and Prasad Jawade)
अमृताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली होती. येत्या १८ नोव्हेंबरला अमृता व प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांनी गुपचूप साखरपुडा सोहळा जरी उरकला असला तरी ते थाटामाटात लग्न करणार असल्याचं सर्वत्र बोललं जात. अशातच अमृताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमृताने प्रसाद बरोबरचा एक फोटो स्टोरीला पोस्ट केला असून यांत अमृता व प्रसाद दोघेही पारंपारिक लूक मध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हा स्पेशल लूक त्यांच्या पहिल्या केळवणासाठी असल्याचं कळतंय. अमृताने ‘ready for पहिलं केळवण’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.
अमृता व प्रसादच्या केळवणाला सुरुवात झालेली आहे. आणि ते दोघे त्यांच्या पहिल्या केळवणासाठी उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या पहिल्या केळवणासाठी दोघांनी पारंपारिक लूक केलेला पाहायला मिळतोय. आता अमृता व प्रसाद यांच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
अमृता देशमुख व प्रसाद जवादे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांची चांगली मैत्री झाली. या घरातील त्यांची भांडण, मिश्किल मैत्री चाहत्यांना विशेष आवडली. बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्यानंतर त्यांची मैत्री अधिकखूळत गेली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.