एखाद्या विशिष्ट कलाकृती मध्ये कलाकार जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो तेव्हा प्रेक्षकांना हे कधी संपूच नये असं वाटत मग त्या कलाकृतीचे एकामागोमाग एक भाग येत जातात आणि प्रेक्षकांना निराश न करता मनोरंजनाची हा गाडी अशीच धावत राहते. प्रेक्षकांच्या मनाला भावलेली अशीच एक कथा जी या आधी २ भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आहे त्या कलाकृतीचा पुढचा भाग ही आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मनोरंजनाच्या विश्वातील या गाजलेल्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे ‘दोन कटींग’.(Amruta deshmukh)
====
हे देखील वाचा- नातं वाचविण्यासाठी आनंदी उचलणार कोणतं पाऊल?
====
या शॉर्ट मध्ये झळकलेले चेहरे मधल्या काळात चांगलेच चर्चेत होते ते आपल्या कामासाठी. अभिनेत्री समृद्धी केळकर ही फुलाला सुगंध मातीचा या स्टार प्रवाह वरील सिरीयल मधून तर अक्षय केळकर हा मनोरंजनच सर्वात लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉस मधून प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरत होते.आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्रितपणे काम करणार असल्याचं चित्र दिसत आहे. दोन कटिंगचा तिसरा भाग येणार असल्याच्या घोषणे नंतर अजून एक मोठी घोषणा या सिरीज बाबतीत करण्यात आली आहे. समृद्धी ने आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

समृद्धी आणि अक्षय या व्हिडिओ मध्ये एक या सिरीजच्या पुढच्या भागाचे वाचन करताना दिसतात आणि मधेच अमृता देशमुखच्या आवाज येतो तेव्हा अक्षय तिला हळू वाचायला सांगतो यावरून या दोघांसोबाबत अमृता देशमुख देखील या सिरीजचा भाग असणार असल्याचं समजत आहेत. त्यामुळे समृद्धीचे चाहते आनंदी असून त्यांनी या विडिओ वर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृता आणि अक्षय हे बिग बॉस मराठी सीझन ४ या पर्वात एकत्र खेळताना दिसले होते. तेव्हा हि प्रेक्षकांना या दोघांची खोडकर भांडण पाहायला आवडत होती आता पुन्हा तीच मस्ती या सिरीज मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.(Amruta deshmukh)